Home /News /sport /

IPL 2022 मेगा ऑक्शनपूर्वी BCCI च्या 'या' निर्णयाकडे सर्व फ्रँचायझींचं लक्ष

IPL 2022 मेगा ऑक्शनपूर्वी BCCI च्या 'या' निर्णयाकडे सर्व फ्रँचायझींचं लक्ष

आयपीएल स्पर्धेतील 10 फ्रँचायझींनी एकूण 33 खेळाडूंना मेगा ऑक्शनपूर्वीच (IPL 2022 Mega Auction) करारबद्ध केले आहे. मात्र या सर्व फ्रँचायझींचे बीसीसीआयच्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे लागले आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या शहराच्या टीम पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) सर्व टीमची नव्याने रचना होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील 10 फ्रँचायझींनी एकूण 33 खेळाडूंना मेगा ऑक्शनपूर्वीच करारबद्ध केले आहे. मात्र या सर्व फ्रँचायझींचे बीसीसीआयच्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे लागले आहे. आयपीएल ऑक्शनसाठी जगभरातील 1 हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बीसीसीआय यापैकी 350-400 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करणार आहे. या शॉर्टलिस्ट झालेल्या खेळाडूंची यादी पुढच्या आठवड्यात सर्व फ्रँचायझींना सोपवण्यात येणार आहे.  त्यामुळे बीसीसीआय कोणत्या खेळाडूंना शॉर्टलिस्ट करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या निर्णयानंतर सर्व फ्रँचायझींना पुढील नियोजन करता येणार आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इनसाईड स्पोर्ट्स दिलेल्या माहितीनुसार, 'जगभरातील बहुतेक बड्या क्रिकेटपटूंनी ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन केले आहे. त्यावरून आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि प्रीमियम लीग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.' इनसाईड स्पोर्ट्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या सर्व बड्या क्रिकेटपटूंनी रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, जोश हेजलवूड, डॅनियल ख्रिस्टीन, झाय रिचर्डसन, मिचेल मार्श, एण्ड्रयू टाय या खेळाडूंचा समावेश आहे. मार्कस स्टॉईनिसला लखनऊ तर ग्लेन मॅक्सवेलला आरसबीने यापूर्वीच रिटेन केले आहे. Legends League Cricket वर पहिल्याच दिवशी संकट, भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह इंग्लंडच्या काही प्रमुख खेळाडूंनी दुखापत, थकवा किंवा अन्य कारणामुळे ऑक्शनमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जो रूट (टेस्ट क्रिकेटवर फोकस करणे), बेन स्टोक्स (फिट नाही) आणि जोफ्रा आर्चर (दुखापत) यांचा समावेश आहे. तर जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिविंगस्टोन हे ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहेत. मोईन अली (CSK) आणि जोस बटलर (Rajasthan Royals) यांना यापूर्वीच फ्रँचायझींनी रिटेन केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या