Home /News /sport /

IPL 2022 : 5 खेळाडू घेणार कोटींची उड्डाणे, 10 टीममध्ये होणार जोरदार लढाई

IPL 2022 : 5 खेळाडू घेणार कोटींची उड्डाणे, 10 टीममध्ये होणार जोरदार लढाई

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या मेगा ऑक्शनचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये हे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे.

    मुंबई, 26 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या मेगा ऑक्शनचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये हे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या सिझनमध्ये 10 टीम सहभागी होणार आहेत. या ऑक्शनसाठी 1200 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामधील 5 बॅटर्सवर कोट्यवधींची बोली  लागणार आहे. सर्व 10 टीममध्ये त्यांना करारबद्ध करण्यासाठी जोरदार चुरस रंगणार आहे. हे पाच खेळाडू कोणते आहेत हे पाहूया डेव्हिड वॉर्नर (David Warner) : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज बॅटर डेव्हिड वॉर्नर मागील आयपीएल सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा सदस्य होता. त्याच्याकडून आधी कॅप्टनसी काढून घेण्यात आली आणि नंतर त्याला टीममधून काढण्यात आले. वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणारा विदेशी बॅटर आहे. त्याला पंजाब, केकेआर किंवा आरसीबी टीमचा कॅप्टन केले जाऊ शकते. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) : श्रेयस अय्यरच्या कॅप्टनसीमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं 2020 साली आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला होता. तो आयपीएल 2021 पूर्वी जखमी झाला होता. त्यामुळे दिल्लीनं ऋषभ पंतला (Rishabh Pant) कॅप्टन म्हणून नियुक्त केले होते. यंदा देखील पंत कॅप्टन आहे. अय्यर आता दिल्लीपासून वेगळा झाला आहे. त्याच्यावर टीम मोठी बोली लावू शकते. श्रेयस अय्यरनं आजवर 156 टी20 इनिंगमध्ये 4180 रन काढले असून यामध्ये 2 शतक आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. क्विंटन डी कॉक (Quintion De Kock) : मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डी कॉकने चांगली कामगिरी केली आहे, दक्षिण आफ्रिकेच्या या विकेटकिपरला ऑक्शनमध्ये चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. क्विंटन टी20 क्रिकेटमधील खतरनाक खेळाडू मानला जातो. त्याने 230 इनिंगमध्ये 7113 रन केले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. IND vs WI: राहुल द्रविड बदलणार रणनीती, 2 दमदार फिनिशर्सचा होणार टीममध्ये समावेश! इशान किशन (Ishan Kishan) : इशान किशन आक्रमक बॅटींगसाठी ओळखला जातो. त्याची आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच टीम इंडियात निवड झाली. विकेट किपर आणि ओपनर या दोन्ही भूमिकेसाठी त्याला खरेदी करण्यात टीममध्ये चुरस असेल. इशाननं टी20 क्रिकेटमधील  104 इनिंगमध्ये 2726 रन काढले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) : डावखुरा बॅटर शिखर धवननं आयपीएलमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तो मागील सिझनमध्ये दिल्लीचा सदस्य होता. त्याने टी20 क्रिकेटमधील 300 इनिंगमध्ये 8775 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या