Home /News /sport /

IPL 2022, RCB vs GT Dream11 Tips: 'हे' खेळाडू देतील तुम्हाला सर्वाधिक पॉईंट्स

IPL 2022, RCB vs GT Dream11 Tips: 'हे' खेळाडू देतील तुम्हाला सर्वाधिक पॉईंट्स

Photo : BCCI

Photo : BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज (गुरूवार) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची लढत गुजरात टायटन्सशी (RCB vs GT) होणार आहे. आरसीबीच्या भवितव्यासाठी हा निर्णायक सामना आहे.

    मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज (गुरूवार) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची लढत गुजरात टायटन्सशी (RCB vs GT) होणार आहे. गुजरातनं यापूर्वीच 'प्ले ऑफ' मधील जागा निश्चित केली आहे. तर आरसीबीच्या भवितव्यासाठी हा निर्णायक सामना आहे. आरसीबीला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी गुजरातवर मोठ्या फरकानं विजय मिळवणे आवश्यक आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म हा आरसीबीसाठी काळजीचा विषय आहे. आरसीबीनं या आयपीएल सिझनची सुरूवात चांगली केली होती. फर्स्ट हाफमध्ये टॉप 4 मध्ये असणाऱ्या आरसीबीनं सेकंड हाफमध्ये सलग 3 सामने गमावले. त्यामुळे त्यांना आता 'प्ले ऑफ' मध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आरसीबीनं आयपीएल 2022 मध्ये 13 पैकी 7 सामने जिंकले असून 6 गमावले आहेत. 14 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये त्यांचा पाचवा क्रमांक आहे. आरसीबीकडून या सिझनमध्ये कॅप्टन फाफ डुप्लेसिसनं सर्वाधिक रन केले आहेत. डुप्लेसिसनं 13 सामन्यात 399 रन केले असून यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 96 हा त्याचा या सिझनमधील सर्वोत्तम स्कोअर आहे. पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात डुप्लेसिस अपयशी ठरला होता. आता गुजरात विरूद्धच्या निर्णायक लढतीत त्याच्यावर आरसीबीची मोठी भिस्त आहे. गुजरात टायटन्सची भिस्त शुभमन गिलवर आहे. त्याने या सिझनमधील 13 सामन्यात 402 रन केले असून यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि राशिद खान हे गुजरातचे प्रमुख बॉलरही चांगलेच फॉर्मात आहेत. गुजरातची 'प्ले ऑफ' मधील जागा निश्चित झाल्यानं कॅप्टन हार्दिक पांड्या या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा प्रयोग करू शकतो. केन विलियमसनच्या जागी SRH कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं आघाडीवर, कुणाला मिळणार संधी? RCB vs GT Dream 11 prediction कॅप्टन: फाफ डुप्लेसी व्हाईस कॅप्टन: शुभमन गिल विकेट किपर: दिनेश कार्तिक बॅटर: रजत पाटीदार, डेविड मिलर, महिपाल लोमरोर ऑल राऊंडर: ग्लेन मॅक्सवेल, राहुल तेवतिया बॉलर: हर्षल पटेल, राशिद खान, मोहम्मद शमी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या