मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs LSG : मुंबईच्या विजयाची प्रतीक्षा संपणार? CPL गाजवणाऱ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश

IPL 2022, MI vs LSG : मुंबईच्या विजयाची प्रतीक्षा संपणार? CPL गाजवणाऱ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश

आयपीएल 2022 मध्ये शनिवारच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात होत आहे.

आयपीएल 2022 मध्ये शनिवारच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात होत आहे.

आयपीएल 2022 मध्ये शनिवारच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात होत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये शनिवारच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात होत आहे. या सिझनमध्ये एकही सामना न जिंकलेली मुंबई इंडियन्स ही एकमेव टीम आहे. मुंबईनं आत्तापर्यंतचे सर्व 5 सामने गमावले आहेत. आता स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इथून पुढे प्रत्येक सामना जिंकण्याचं आव्हान मुंबईपुढे आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णाधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.  वेस्ट इंडिजचा फॅबियन एलन (Fabian Allen) मुंबईकडून पदार्पण करणार आहे. फॅबियन एलन डावखुरी स्पिन बॉलिंगशिवायच खालच्या क्रमांकावर आक्रमक बॅटिंग करतो. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही एलनने बॉलिंगशिवाय बॅटिंगमध्येही धमाका केला आहे. त्याचबरोबर तो चपळ फिल्डरही आहे. तर लखनऊनं त्यांच्या टीममध्ये एक बदल केला असून कृष्णप्पा गौतमच्या जागी मनिष पांडेचा समावेश केला आहे.

डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही मुंबईची मिडल ऑर्डर फॉर्मात आहे. आता लखनऊला हरवण्यासाठी रोहित शर्मा आणि इशान किशननंही दमदार ओपनिंग करण्याची गरज आहे. मुंबईचे बॉलर्स या स्पर्धेत फेल ठरले आहेत. लखनऊ विरूद्ध त्यांनाही कामगिरी उंचावण्याचं आव्हान आहे.

लखनऊनं आत्तापर्यंत पाच पैकी 3 सामने जिंकले असून पॉईंट टेबलमध्ये ही टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. क्विंटन डी कॉक आणि कृणाल पांड्या हे मागील सिझनपर्यंत मुंबईचे सदस्य असलेले खेळाडू या मॅचमध्ये लखनऊकडून खेळणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष असेल. केएल राहुल हा लखनऊचा कॅप्टन असून तो नेहमीच मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याचबरोबर जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉईनिस हे दोन उपयुक्त ऑल राऊंडर्स लखनऊकडे आहेत.

IPL मध्ये 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच होणार 'तो' प्रकार, BCCI नं घेतला मोठा निर्णय

मुंबई इंडियन्सची Playing 11 : रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकत, एम. अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, फॅबियन एलन

लखनऊ सुपर जायंट्सची Playing 11 : केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनिष पांडे मार्कस स्टॉईनिस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Mumbai Indians, Rohit sharma