मुंबई, 20 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) दुहेरी धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरूद्ध लखनऊचा 18 रननं पराभव झाला. या मॅचमध्ये राहुलवर आयपीएल स्पर्धेची आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राहुलला आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हर-1 नुसार मॅच फिसमधील 20 टक्के आर्थिक दंड सुनावण्यात आला आहे. राहुलनं त्याची चूक मान्य करत आर्थिक दंड स्वीकारला आहे. राहुलसह लखनऊचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिसवरही (Marcus Stoinis) कारवाई करण्यात आली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सच्या डावातील 19 व्या ओव्हरमधील ही घटना आहे. 19 व्या ओव्हर दरम्यान दुसऱ्या बॉलवर जोश हेजलवुडने मार्कस स्टोइनिस बोल्ड केले. स्टॉईनिसचा हेजलवूडच्या बॉलवर स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तो बोल्ड झाला. आऊट झाल्यानंतर त्याचं स्वत:वरील नियंत्रण सुटले आणि त्यानं नाराज होत शिवीगाळ केली. त्याची शिवीगाळ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली होती.
हेजलवूडनं टाकलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये टाकलेला पहिला बॉल अंपायरनं वाईड दिला् नव्हता. त्याबद्दल त्यांना अंपायरकडं नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारात त्याची एकग्रता भंग झाली आणि तो पुढच्या बॉलवर आऊट झाला. या सर्व प्रकरामुळे स्टॉईनिस त्याची नाराजी लपवू शकला नाही. त्याबद्दल त्याच्यावरही लेव्हल 1 मधील नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
IPL 2022 : लखनऊच्या पराभवातही राहुलची कमाल, विराटला मागं टाकत केली रेकॉर्डब्रेक कामगिरी
स्टॉईनिस आऊट झाल्यानंतर मॅच आरसीबीकडे झुकली. जेसन होल्डरनं शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स लगावूनही लखनऊला पराभव टाळता आला नाही. आरसीबीकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर हर्षल पटेलला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या विजयासह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आरसीबीने 7 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. लखनऊची टीम चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांचे 7 सामन्यात 4 विजय आणि 3 पराभव झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.