• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022: मुंबई - चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार! वाचा तारखांबाबतचे मोठे अपडेट

IPL 2022: मुंबई - चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार! वाचा तारखांबाबतचे मोठे अपडेट

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सिझनची (IPL 2022) तयारी सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम खेळणार हे स्पष्ट आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सिझनची (IPL 2022) तयारी सुरू झाली आहे.  पुढील आयपीएल सिझनपूर्वी मेगा ऑक्शन होणार असून दोन नव्या टीम देखील स्पर्धेत खेळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ या दोन नव्या शहरांच्या टीम पुढील सिझनमध्ये पहिल्यांदाच उतरत असल्यानं आता एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. 'क्रिकबझ' नं दिलेल्या रिपोर्टनुसार 14 व्या सिझनची सुरूवात चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) होम ग्राऊंड असलेल्या चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवरून होईल. या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार आहेत. पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळला जाण्याची शक्यता आहे. 60 दिवस ही स्पर्धा चालणार असून फायनल मॅच 4 किंवा 5 जून रोजी होईल. आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम खेळणार हे स्पष्ट आहे. त्यांच्या विरुद्ध कोणती टीम खेळेल हे अजून निश्चित झालेलं नाही. पण, 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. प्रत्येक टीम 14 सामने खेळणार असून यामध्ये 7 सामने होम ग्राऊंडवर आणि 7 बाहेरच्या मैदानावर होतील. IPL 2022 भारतामध्ये होणार आयपीएलचा पुढील सिझन भारतामध्येच होणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी केली आहे. चेन्नईतील 'चॅम्पिंयन्स कॉल' या कार्यक्रमात शहा सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी पुढील सिझन भारतामध्येच होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमनं चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल काही दिवसांपूर्वी हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात शहा बोलत होते. 'मला माहिती आहे की, तुम्ही सर्वजण सीएसकेला चेपॉकच्या मैदानात खेळताना पाहण्याची आतुरतेनं वाट पाहात आहात. आता हा क्षण फार दूर नाही. आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन भारतामध्येच खेळवला जाणार आहे. दोन नव्या टीमच्या सहभागामुळे आगामी सिझन अधिक चुरशीचा होईल.' असे शहा यांनी स्पष्ट केले. विराट कोहलीचा फेवरेट खेळाडू झाला फिट, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणार निवड! आयपीएलच्या मागील सिझनचा (IPL 2021) सुरुवातीचा भाग भारतामध्ये झाला. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे त्यानंतर उत्तरार्ध यूएईमध्ये शिफ्ट करावा लागला. या स्पर्धेची फायनल देखील यूएईमध्येच झाली. आयपीएल स्पर्धेचा मेगा ऑक्शन डिसेंबरमध्ये होणार आहे. तो आणखी खास होईल, अशी अपेक्षा शहा यांनी यावेळी व्यक्त केली.
  Published by:News18 Desk
  First published: