मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : हरभजन सिंग निवृत्तीनंतर 'या'टीमसोबत सुरू करणार नवी इनिंग!

IPL 2022 : हरभजन सिंग निवृत्तीनंतर 'या'टीमसोबत सुरू करणार नवी इनिंग!

टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) कोच म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहे.

टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) कोच म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहे.

टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) कोच म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहे.

मुंबई, 29 डिसेंबर : टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने मागील आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजन दोन दशकांहून अधिक काळ स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सक्रीय होता. तो टेस्ट क्रिकेटमधील चौथ्या क्रमांकाचा यशस्वी भारतीय बॉलर आहे. हरभजन आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स (MI), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या टीमचा सदस्य होता.

हरभजन सिंग निवृत्तीनंतर पंजाबच्या राकारणात सक्रीय होणार अशी चर्चा होती. पण, त्याला अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तो आगामी आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) कोच म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहे. हरभजन सिंग कोलताता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून आगामी सिझनमध्ये काम करेल, असं वृत्त 'दैनिक जागरण' नं दिलं आहे.

हरभजन आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये या विषयावर बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हरभजन यावर्षीच्या आयपीएल सिझनमध्ये कोलकाताचा सदस्य होता. आपण निवृत्तीचा निर्णय यापूर्वीच घेतला होता, पण केकेआरसोबत करार केल्यानं मला यावर्षीचा आयपीएल सिझन पूर्ण करणे भाग होते, असे हरभजननं निवृत्तीच्या वेळी सांगितले होते. हरभजनला या सिझनमध्ये फार संधी मिळाली नाही, पण केकेआरनं यंदा फायनल गाठण्याचा पराक्रमक केला होता. चेन्नई सुपर किंग्सनं फायनलमध्ये त्यांचा पराभव केला. केकेआरनं आगामी सिझनसाठी आंद्रे रसेल, सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर आणि वरूण चक्रवर्ती यांना रिटेन केले आहे.

ऋषभ पंत कोण आहे, हेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री विसरले! जगासमोर झाली फजिती

हरभजनची कारकिर्द

हरभजनने 1998 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने टीम इंडियाकडून 103 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या. तसंच 2 शतकांसह 2235 रन काढले. तर 236 वन-डेमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. टी20 इंटरनॅशनलमध्ये हरभजनच्या नावावर 28 मॅचमध्ये 25 विकेट्सची नोंद आहे. टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि आर. अश्विन (427) यांच्यानतर हरभजननं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

First published:

Tags: Harbhajan singh, Ipl 2022, KKR