मुंबई, 23 मे : गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात मंगळवारी आयपीएल स्पर्धेतील क्वालिफायर वनचा सामना खेळला जाणार आहे. गुजरात पॉईंट टेबलमध्ये टॉपर असून राजस्थानची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यातील विजयी टीम थेट फायनलमध्ये जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये या लढतीची मोठी उत्सुकता आहे, पण कोलकातामधील हवामानानं फॅन्स तसंच बीसीसीआयची काळजी वाढवली आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या 'काल बैसाखी' वादळचा प्रभाव आहे. त्यामुळे कोलकातामध्ये वादळासह मुसळधार पाऊस झाला. आयपीएल 'प्ले ऑफ' पूर्वी इडन गार्डन्सचंही मोठं नुकसान झालं आहे. शनिवारी झालेल्या पावसात प्रेस बॉक्सच्या समोरील लाल ग्लासचं नुकसान झालं आहे. स्टेडिअममध्ये लावण्यात आलेले होर्डिंग खाली पडले. तसंच पावसापासून वाचवण्यासाठी आऊट फिल्ड झाकण्यासाठी घालण्यात आलेल्या कव्हर्सचा काही भाग उडाला आहे.

कोलकातामधील वादळाचा फटका गुजरात टायटन्सच्या तयारीलाही बसला आहे. त्याचं विमान या वादळामुळे उशीरा दाखल झालं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी तातडीनं इडन गार्डन्स स्टेडियमला भेट देऊन पाऊस आणि वादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंगळवारी होणाऱ्या मॅचपूर्वी दुरूस्तीचे सर्व काम पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पुढील दोन-तीन दिवस कोलकातामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आऊट फिल्ड ओले होण्याची शक्यता आहे. पहिल्या क्वालिफायरच्या दिवशी देखील संध्याकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
IPL 2022 : मुंबईच्या मॅचमध्ये दिसल्या 2 मिस्ट्री गर्ल, इशान किशनशी आहे कनेक्शन
आयपीएल स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पहिल्या क्वालिफायरसाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाला तर पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेली गुजरातची टीम सरळ फायनलमध्ये जाईल आणि राजस्थानला क्वालिफायर 2 खेळण्याची संधी मिळेल. आयपीएल 2022 ची फायनल रविवारी म्हणजेच 29 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.