Home /News /sport /

IPL 2022, GT vs CSK : गुजरात विरूद्ध चेन्नईनं केले 4 बदल, धोनीनं टॉस जिंकला!

IPL 2022, GT vs CSK : गुजरात विरूद्ध चेन्नईनं केले 4 बदल, धोनीनं टॉस जिंकला!

आयपीएल 2022 मधील रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात होत आहे.

    मुंबई, 15 मे : आयपीएल 2022 मधील रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात होत आहे. गुजरातनं यापूर्वीच्या मॅचमध्ये पॉईंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचा 62 रननं मोठा पराभव केला होता. गुजरातचा 'प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्चित केला आहे. आता चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत लीग स्टेजमध्ये पहिला क्रमांक बळकट करण्याची संधी गुजरातला आहे. लीग स्टेजमध्ये पहिल्या दोनमध्ये राहणाऱ्या टीमला 'प्ले ऑफ' मध्ये फायनलमध्ये जाण्याची एक अधिक खेळण्याची संधी मिळते त्यामुळे या सामन्यात जिंकण्याचे गुजरातचे लक्ष्य असेल. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलाय. या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे चेन्नईनं टीममध्ये चार बदल केले असून नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. चेन्नईनं अंबातू रायुडू, रॉबिन उथप्पा, महीश तिक्षाणा आणि ड्वेन ब्राव्हो यांना वगळले असून त्यांच्या जागी नारायण जगदीशन, प्रशांत सोळंकी, मिचेल स्टँनर आणि मधीशा पथिराना यांचा टीममध्ये समावेश केला आहे. गुजरात टायटन्सनं त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईला यापूर्वीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 5 विकेट्स  पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई विरूद्ध चेन्नईची टीम 97 रनवरच ऑल आऊट झाली होती. आता उर्वरित दोन सामने जिंकून शेवट गोड करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. गुजरात टायटन्सनं या सिझनमध्ये अनेकांचा अंदाज चुकवत दमदार कामगिरी केली आहे. डेव्हिड मिलर आणि राशिद खान यांनी चेन्नई विरूद्धच्या मागील सामन्यात दमदार भागिदारी करत विजय खेचून आणला होता. 'प्ले ऑफ' पूर्वी गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं चांगली कामगिरी करणे हे टीमसाठी आवश्यक आहे. गुजरात टायटन्स Playing 11 : शुभमन गिल, वृद्धीमान साहा, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, आर. साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल चेन्नई सुपर किंग्स Playing 11 : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली,  शिवम दुबे, नारायण जगदीशन, महेंद्रसिंह धोनी, मिचेल स्टँनर, प्रशांत सोळंकी, मधीशा पथिराना,  सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022

    पुढील बातम्या