Home /News /sport /

IPL 2022, GT vs CSK Dram 11 Team Prediction : 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

IPL 2022, GT vs CSK Dram 11 Team Prediction : 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश

आयपीएल 2022 मधील पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सची लढत आज (रविवार) चेन्नई सुपर किंग्सशी (Gujrat Titans vs Chennai Super Kings) होणार आहे.

    मुंबई, 15 मे : आयपीएल 2022 मधील पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सची लढत आज (रविवार) चेन्नई सुपर किंग्सशी (Gujrat Titans vs Chennai Super Kings) होणार आहे. गुजरातनं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 9 विजय मिळवले असून त्यांनी 'प्ले ऑफ' मधील जागा निश्चित केली आहे. आता 'प्ले ऑफ' मधील टॉप 2 टीममध्ये स्थान निश्चित करण्याच्या उद्देशानं गुजरात या मॅचमध्ये उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईला यापूर्वीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 5 विकेट्स  पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई विरूद्ध चेन्नईची टीम 97 रनवरच ऑल आऊट झाली होती. आता उर्वरित दोन सामने जिंकून शेवट गोड करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानं चेन्नई काही प्रयोग करण्याची शक्यता आहे. या प्रयोगाचा भाग म्हणून अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य राजवर्धन हंगरगेकरचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या ओपनिंग जोडीचा गुजरातला धोका आहे. मागील दोन विजयात या जोडीचा महत्त्वाचा वाटा होता. चेन्नईच्या मिडल ऑर्डरमध्ये सातत्य नाही. तर बॉलिंगची भिस्त ही अनुभवी ड्वेन ब्राव्होवर असेल. नवोदीत मुकेश चौधरीनं या सिझनमध्ये 'पॉवर प्ले' किंग ठरलाय. त्यानं पॉवर प्ले मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक 11 विकेट्स घेतल्या आहेत. मुकेशला गुजरातच्या मोहम्मद शमीचं आव्हान असेल. शमी या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. शमी प्रमाणेच अनुभवी राशिद खान आणि नवोदीत यश दयाल यांनीही गुजरातच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलीय. कॅप्टन हार्दिक पांड्यानं मोठी खेळी करणे गुजरातसाठी आवश्यक आहे. IPL 2022 : राजस्थानला विजय आवश्यक, रबाडाच्या मित्राची झाली टीममध्ये एन्ट्री! GT vs CSK Dream11 Team Prediction कॅप्टन : शुभमन गिल व्हाईस कॅप्टन : डेव्हॉन कॉनवे विकेट किपर : वृद्धीमान साहा बॅटर : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, शुभमन गिल ऑल राऊंडर्स : हार्दिक पांड्या, मोईन अली, राहुल तेवातिया बॉलर्स : मोहम्मद शमी, राशिद खान, मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Gujarat Titans, Ipl 2022

    पुढील बातम्या