मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 Prize Money : चॅम्पियन टीम होणार मालामाल, वाचा किती मिळणार बक्षिसाची रक्कम

IPL 2022 Prize Money : चॅम्पियन टीम होणार मालामाल, वाचा किती मिळणार बक्षिसाची रक्कम

आयपीएल 2022 ची फायनल आज (रविवार) राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे.

आयपीएल 2022 ची फायनल आज (रविवार) राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे.

आयपीएल 2022 ची फायनल आज (रविवार) राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे.

    मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 ची फायनल आज (रविवार) राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. गुजरात टायटन्सची टीम पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थाननं 2008 साली ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी ही टीम फायनल खेळणार आहे. लीग स्टेजमध्ये टॉप 2 वर असलेल्या टीममध्ये चुरशीची फायनल होईल अशी अपेक्षा आहे. आयपीएल 2022 च्या विजेत्या टीमला फक्त आकर्षक ट्रॉफी मिळणार नाही तर बक्षिसाची मोठी रक्कम देखील मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार विजेत्या टीमला 20 कोटी तर फायनलमध्ये हरणाऱ्या टीमला 13 कोटी रूपये बक्षीस मिळणार आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 50 लाखांनी जास्त आहे. गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला उपविजेतेपद पटकावल्यानंतर 12 कोटी 50 लाख रूपये मिळाले होते. आयपीएल चॅम्पियन टीमच्या बक्षिसामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला 20 कोटी मिळाले होते. यंदाही विजेत्या टीमला तितकीच रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. आरसीबीला मिळणार 7 कोटी आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये खेळणाऱ्या टीमवरही धनवर्षाव होणार आहे. तिसऱ्या नंबरच्या (क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेल्या) टीमला 7 कोटी रूपये. चौथ्या क्रमांकावरच्या टीमला 6.5 कोटी रूपये रक्कम दिली जाईल. याचाच अर्थ राजस्थान रॉयल्सकडून क्वालिफायर 2 मध्ये पराभूत होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 7 कोटी तर लखनऊ सुपर जायंट्सला साडे सहा कोटी रूपये मिळणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून आयपीएल विजेत्या टीमला 20 कोटी रूपये बक्षीस म्हणून दिले जात आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहे. त्याला बक्षीस म्हणून 15 लाख रूपये मिळतील. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूलाही 15 लाखांचे बक्षीस आणि पर्पल कॅप देण्यात येईल. तर इमर्जिंग प्लेयरला 20 लाखांचे बक्षीस मिळेल. IPL 2022 : चार शतकांसह Jos Buttler ने घडवला इतिहास, दिग्गजांनाही दिली धोबीपछाड 14 वर्षांमध्ये 4 पट वाढ आयपीएल 2008 साली झालेल्या पहिल्या सिझनच्या विजेत्या टीमला 4.8 कोटी तर उपविजेत्या टीमला 2.4 कोटी रूपये मिळाले होते. गेल्या 14 वर्षांमध्ये या रकमेत 4 पट वाढ झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या