Home /News /sport /

IPL 2022: नव्या जबाबदारीवर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL 2022: नव्या जबाबदारीवर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. त्याचा रोल मात्र यंदा बदलला आहे. गं

    मुंबई, 19 डिसेंबर : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. त्याचा रोल मात्र यंदा बदलला आहे. गंभीरची लखनऊ फ्रँचायझीनं (Lucknow Franchise) टीमचा मेंटॉर म्हणून निवड केली आहे. लखनऊ ही आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी टीम आहे. आरपीएसजी ग्रुपने (RPSG) 7090 कोटींना ही टीम खरेदी केली आहे. गंभीरनं टीमचा मेन्टॉर झाल्यानंतर ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होणे हा माझा बहुमान आहे. लखनऊ टीमचा मेंटॉर म्हणून निवड केल्याबद्दल मी डॉक्टर संजीव गोयंका यांचे आभार मानतो. माझ्या ऱ्हदयात विजयाची आग अजूनही कायम आहे. मी ड्रेसिंग रूमसाठी नाही तर उत्तर प्रदेशसाठी संघर्ष करेल.' लखनऊ टीमच्या हेड कोचपदी झिम्बाब्वेचे माजी कॅप्टन अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्लॉवर यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचे असिस्टंट कोच होते. टीम इंडियाचे माजी विकेट किपर विजय दहिया असिस्टंट कोच असतील. दहिया हे सध्या उत्तर प्रदेश क्रिकेट टीमचे हेड कोच आहेत. गौतम गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये कोलकाचा नाईट रायडर्सनं (KKR) दोन वेळा (2012, 2014) आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. गंभीरनं ही टीम सोडल्यानंतर कोलकाताला आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. केकेआरनं यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) फायनलमध्ये धडक मारली होती. पण, चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमनं त्यांचा पराभव केला. क्रिकेट वेस्ट इंडिजचा मोठा निर्णय, निराशाजनक कामगिरीनंतर 'या' दिग्गजांची हकालपट्टी टीम इंडियानं जिंकलेल्या 2 वर्ल्ड कपमध्ये गंभीरचे मोलाचे योगदान आहे. त्याने 2011 साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये 97 रनची खेळी केली होती. तर 2007 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत गंभीरनं 75  रन करत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gautam gambhir, Ipl 2022

    पुढील बातम्या