Home /News /sport /

IPL 2022 : गौतम गंभीरचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2022 : गौतम गंभीरचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) आयपीएल टीममध्ये पुनरागमन झाले आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या टीमची मोठी जबाबदारी त्याला सोपवण्यात आली आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) आयपीएल टीममध्ये पुनरागमन झाले आहे. आयपीाएल स्पर्धेच्या इतिहासातील एक यशस्वी बॅटर आणि कॅप्टन म्हणून गंभीरची ओळख आहे. गंभीरच्याच कॅप्टनसीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. गंभीर 2018 साली आयपीएलमधून निवृत्त झाला. त्यानंतर 4 वर्षांनी नव्या भूमिकेत परतला आहे. आयपीएलच्या पुढील सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनऊ टीमनं (Lucknow) गंभीरची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. 'क्रिकबझ' नं दिलेल्या वृत्तानुसार लखनऊ टीमचे मालक संजीव गोयंका (Sanji Goenka) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी टीम असलेल्या लखनऊनं आगामी आयपीएल सिझनची तयारी जोरदार सुरू केली आहे. संजीव गोयंका यांनी ही टीम 7090 कोटींना विकत घेतली होती. या टीमच्या हेड कोचपदी झिम्बाब्वेचे माजी कॅप्टन अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांची शुक्रवारीच नियुक्ती करण्यात आली आहे. फ्लॉवर यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचे असिस्टंट कोच होते. लखनऊच्या टीमनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव कॅप्टन म्हणून नक्की केली असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याची अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. बीसीसीआयनं यापूर्वी राहुलला टी20 टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नसल्यानं टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टनपदाची जबाबदारी देखील राहुलकडे सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी 'या' खेळाडूची निवड, रोहितची घेणार जागा केएल राहुल प्रमाणे राशिद खान (Rashid Khan) आणि इशान किशनदेखील (Ishan Kishan) लखनऊच्या टीमचा भाग असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना आयपीएल ऑक्शनपूर्वीच करारबद्ध केले जाणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या आयपीएल स्पर्धेतील दोन नव्या टीम असून त्यांना कमाल 3 खेळाडूंना मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध करता येणार आहे. या खेळाडूंना करारबद्ध करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gautam gambhir, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या