Home /News /sport /

IPL 2002 : हार्दिक पांड्याला अहमदाबाद टीमनं कॅप्टन का केले? अखेर रहस्य उघड

IPL 2002 : हार्दिक पांड्याला अहमदाबाद टीमनं कॅप्टन का केले? अखेर रहस्य उघड

आयपीएलमध्ये नव्यानं दाखल झालेल्या अहमदाबाद टीमनं (Ahmedabad Team) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे. टीम मॅनेजमेंटनं ही निवड का केली याचे रहस्य अखेर उघड झाले आहे.

    मुंबई, 23 जानेवारी : आयपीएलमध्ये नव्यानं दाखल झालेल्या अहमदाबाद टीमनं  (Ahmedabad Team) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा पर्याय बाजूला करत टीमनं हार्दिकवर विश्वास दाखवला आहे. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या हार्दिकला कॅप्टनपदाची मोठी जबाबदारी का देण्यात आली याचे कारण आता उघड झाले आहे. अहमदाबाद टीमचे मेंटॉर गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांनी हार्दिकला कॅप्टन करण्याचे रहस्य उघड केले आहे. 'मी एका तरूण आणि नव्या कॅप्टनसोबत (हार्दिक पांड्या) काम करण्याची वाट पाहात आहे. टीमसाठी योजना बनवणे तसंच कॅप्टन म्हणून या स्तरावर काय करता येईल हे दाखवण्यासाठी त्याला प्रेरित केले जाईल. तो एक जबरदस्त खेळाडू आहे. टीमसाठी रणनीती तयार करणाऱ्या गटामध्ये सहभागी होण्यासाठी तो उत्सुक असल्याचं मी ऐकलं आहे. त्याला या स्पर्धेचं महत्त्व माहिती आहे. या प्रकारचा खेळाडू टीममध्ये असणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे,' असे कस्टर्न यांनी स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलताना सांगितले. अहमदाबादने हार्दिकसह अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान आणि टीम इंडियाचा युवा बॅटर शुभमन गिल यांनाही करारबद्ध केले आहे. त्या दोघांचेही कर्स्टन यांनी स्वागत केले आहे. 'मी या दोघांची निवड झाल्याने आनंदी आहे. दोघेही चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. विशेषत: गिल खास खेळाडू आहे. तो भारताकडून आणखी क्रिकेट खेळेल असे मला वाटते. U19 World Cup : भारत-पाकिस्तान क्वार्टर फायनलमध्ये, वाचा कधी होणार एकमेकांशी सामना यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या  हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आले  आहे. त्याचबरोबर राशिद खानवरही इतकेच पैसे खर्च करण्यात आले आहेत. शुभमन गिलला 8 कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. गिल यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत होता. तर राशिद सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सदस्य होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hardik pandya, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या