Home /News /sport /

IPL 2022 Final : बटलर-राशिदमध्ये होणार निर्णायक लढाई, पाहा कशी असेल दोन्ही टीमची Playing11

IPL 2022 Final : बटलर-राशिदमध्ये होणार निर्णायक लढाई, पाहा कशी असेल दोन्ही टीमची Playing11

राजस्थानचा जॉस बटलर (Jos Buttler) आणि गुजरातचा राशिद खान (Rashid Khan) यांच्यात या फायनलमध्ये निर्णायक लढाई होणार आहे.

    मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 स्पर्धेची फायनल  मॅच (IPL 2022 Final) आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात ही फायनल होत आहे. राजस्थाननं 2008 साली दिवंगत शेन वॉर्नच्या कॅप्टनसीमध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पहिल्यांदाच या टीमनं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पदार्पणातील सिझनमध्येच विजेतपद जिंकण्याची संधी गुजरात टायटन्सला आहे. राजस्थानचा जॉस बटलर (Jos Buttler) विरूद्ध गुजरातचा राशिद खान (Rashid Khan) यांच्यात या फायनलमध्ये निर्णायक लढाई होणार आहे. बटलरनं या सिझनमधील 16 सामन्यांत 824 रन केले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याकडून आजही चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. बटलरच्या वाटचालीत राशिद हा मुख्य धोका आहे.  बटलरनं राशिद विरूद्ध 41 बॉलमध्ये फक्त 25 रन काढले असून त्यामध्ये तो 4 वेळा आऊट झाला आहे. विशेष म्हणजे बटलरला राशिद विरूद्ध आजवर एकही बाऊंड्री मारता आलेली नाही. या दोन दिग्गजांमधील लढाई फायनलचं भवितव्य ठरवणार आहे. गुजरातच्या बॅटींगची भिस्त शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर जोडीवर आहे. त्यांना रोखण्यासाठी आर. अश्विन आणि युजवेंद्र चहल हे अनुभवी स्पिनर्स जोडी राजस्थानकडं आहेत. या स्पर्धेतील विजेत्या टीमला 20 कोटी तर उपविजेत्या टीमला 13 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing11 : जॉस बटलर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबैड मॅकॉय आणि युजवेंद्र चहल. गुजरात टायटन्सची संभाव्य Playing 11 : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा , मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि यश दयाल. IPL 2022 Final : अमित शहा राहणार उपस्थित, नरेंद्र मोदी स्टेडिअमला छावणीचं स्वरूप, 6000 सुरक्षारक्षक तैनात राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, रियान पराग, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेद मैकॉय, अनुनय सिंह, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढ़वाल, जेम्स नीशाम, नाथन कूल्टर-नाइल, रेसी वान डेर डुसेन, डेरिल मिशेल , कॉर्बिन बॉश. गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कॅप्टन), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंह, बी साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानुल्ला गुरबाज, ऋद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नालकंडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, आर. साई किशोर, वरुण आरोन, यश दयाल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या