मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 :रोहित शर्माची नवी चाल, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानात होणार 'या' खेळाडूची एन्ट्री!

IPL 2022 :रोहित शर्माची नवी चाल, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानात होणार 'या' खेळाडूची एन्ट्री!

मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल 2022 हे सर्वात निराशाजनक ठरलं आहे. मुंबई इंडियन्सला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) नवी चाल खेळलीय.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 एप्रिल : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल 2022 हे सर्वात निराशाजनक ठरलं आहे. मुंबईला स्पर्धेत अद्याप एकही विजय मिळालेला नाही. त्यांनी सर्व सहा सामने गमावले आहेत. या आयपीएल सिझनमध्ये एकही सामना न जिंकलेली मुंबई ही एकमेव टीम आहे. या 6 पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. आता उर्वरित 8 सामन्यांमध्ये  आणखी नामुश्की टाळण्याचं आव्हान मुंबईसमोर आहे.

मुंबई इंडियन्सला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) नवी चाल खेळलीय. या सिझनमध्ये मुंबईच्या बॉलर्स सपशेल अपयशी ठरलेत. बॉलिंगमधील खराब कामगिरी हे टीमच्या अपयशाचं प्रमुख कारण आहे. मुंबईची ही अडचण दूर करण्यासाठी अनुभवी फास्ट बॉलर धवल कुलकर्णीची (Dhawal Kulkarni) लवकरच मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री होणार आहे, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलं आहे.

धवल कुलकर्णीला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा मोठा अनुभव आहे. मुंबई इंडियन्ससह राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लॉयन्स या टीमकडून तो आयपीएलमध्ये खेळला असून त्यानं या स्पर्धेत 86 विकेट्स घेतल्या आहेत. धवलला आयपीएल 2020 मधील लिलावात मुंबई 75 लाखांना खरेदी केले होते. तो 2021 मध्येही मुंबईच्याय टीममध्ये होता. पण, या कालखंडात त्याला फक्त एका मॅचमध्ये संधी देण्यात आली.

या आयपीएल ऑक्शनमध्ये धवल अनसोल्ड ठरला होता. सध्या तो 'स्टार स्पोर्ट्स' हिंदीच्या कॉमेंट्री टीमचा सदस्य आहे.मुंबईतील पिचवर बॉलिंग करण्याचा मोठा अनुभव धवलकडं आहे. त्याचा हा अनुभव टीमच्या फायद्याचा ठरू शकतो. मुंबई इंडियन्सची पुढील लढत गुरूवारी चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध (Mumbai Indians vs Chennai Super Kings) होणार आहे.

IPL 2022, PBKS vs DC : कोरोनाग्रस्त दिल्लीमध्ये होणार बदल, 'या' खेळाडूंवर असेल पंतची भिस्त

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma