Home /News /sport /

IPL 2022 : ऋषभ पंतनं सांगितलं रागाचं कारण, संजू सॅमसननंही दिलं उत्तर

IPL 2022 : ऋषभ पंतनं सांगितलं रागाचं कारण, संजू सॅमसननंही दिलं उत्तर

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचला अंपायरच्या वादग्रस्त निर्णयाचं गालबोट लागलं.

    मुंबई, 23 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचला अंपायरच्या वादग्रस्त निर्णयाचं गालबोट लागलं. दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 36 रन हवे होते. रोव्हमन पॉवेलनं पहिल्या 3 बॉलवर सिक्स मारत मॅचमध्ये रंगत वाढवली. राजस्थानचा बॉलर ओबेड मकॉय यानं टाकलेला तिसरा बॉल नो बॉल असल्याचं दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचं मत होतं. नाराज पंतनं तर थेट खेळाडूंना परत बोलवण्याचा इशारा केला होता. पंतनं सांगितलं कारण ऋषभ पंतनं मॅचनंतर बोलताना या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'तो नो बॉल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला असता. डग आऊटमध्ये आम्ही सर्व निराश झालो होतो. तो नो बॉल असल्याचं सर्वांनी पाहिलं. माझ्या मते थर्ड अंपायरनं हस्तक्षेप करत नो बॉल द्यायला हवा होता.  प्रविण आम्रे यांना मैदानात पाठवणे चूक होते, हे मला माहितीय. पण, आमच्याबाबतीत जे घडलं ते चूक होतं.' दिल्ली कॅपिटल्सनं अंपायर्सच्या निर्णायवर आक्षेप घेतल्यानं मॅच काही काळ थांबली होती. प्रवीण आम्रे यांनी मैदानात येत हा निर्णय थर्ड अंपायरकडं सोपवण्याची मागणी केली, पण मैदानातील अंपायर्स त्यांच्या निर्णायवर ठाम होते. IPL 2022 : शेवटच्या ओव्हरमध्ये जोरदार ड्रामा, पंतनं केली धोनीसारखी कृती! अंपायर आणि बटलरलाही भिडला संजू सॅमनसचं उत्तर दिल्ली कॅपिटल्सवरील विजयानंतर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तो फुलटॉस बॉल होता. अंपायरनं तो सामान्य बॉल असल्याचा निर्णय दिला आणि ते या निर्णयावर ठाम राहिले,' असं सॅमसननं स्पष्ट केलं. यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलरनं दमदार कामहगिरी केली. बटलरनं या आयपीएल सिझनमधील तिसरं शतक झळकावलं. त्यानं 65 बॉलमध्ये 9 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीनं 116 रन केले. बटलरनं देवदत्त पडिक्कल सोबत 155 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली. पडिक्कलनं 35 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्ससह 54 रन काढले. कॅप्टन संजू सॅमननं 19 बॉलमध्ये नाबाद 46 रनची खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals, Rishabh pant, Sanju samson

    पुढील बातम्या