दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत यावेळी चांगलाच नाराज झाला होता. त्याने मैदानात बॅटींग करत असलेल्या खेळाडूंना परत येण्याचा इशारा केला. दिल्लीचे असिस्टंट कोच प्रवीण आम्रे यांनी यावेळी मैदानात धाव घेत अंपायरचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. याच प्रकारची घटना आयपीएल 2019 मध्येही झाली होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) नो बॉल न दिल्यानं मैदानात येऊन अंपायरशी वाद घातला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा शेवटपर्यंत संघर्ष! पण, अखेर राजस्थानच ठरलं Royal बटरलरशी वाद ऋषभ पंतनं यावेळी बाऊंड्री लाईनवर उभा असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जॉस बटलरशीही वाद घातला. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष झाल्याचं यावेळी दिसलं. अंपायरनं या सर्व प्रकरणात ठाम राहात खेळ पुन्हा सुरू केला. शेवटच्या तीन बॉलमध्ये पॉवेलला फक्त 2 रन करता आले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सनं ही मॅच 15 रननं जिंकली. या विजयासह राजस्थान रॉयल्सनं पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर एन्ट्री केली आहे.Rishabh Pant is calling his batsmen back because the umpires are not checking the no ball #IPL2022 pic.twitter.com/AMRYbgm6qx
— India Fantasy (@india_fantasy) April 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals, Rishabh pant