मुंबई, 23 एप्रिल : या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) दमदार फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरनं (Jos Buttler) शुक्रवारी आणखी एक शतक झळकावलं. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये बटलरनं 65 बॉलमध्ये 116 रनची खेळी केली. बटलरचं या सिझनमधील हे तिसरं शतक आहे.
बटलरनं सावध सुरूवात केली. मैदानात जम बसल्यानंतर त्यानं दिल्लीच्या एकाही बॉलरला सोडलं नाही. त्यानं मैदानाच्या सर्व बाजूंना सिक्स आणि फोरचा वर्षावर केला. दिल्लीचा मुख्य बॉलर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) त्यानं विशेष लक्ष्य केलं. बटलरनं शार्दुलच्या बॉलिंगवर एक मोठा सिक्स लगावला.
राजस्थान रॉयल्सच्या इनिंगमधील 10 व्या ओव्हरमध्ये त्यानं हा सिक्स लगावला. या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर बटलरनं क्रिझमध्ये उभं राहातच 107 मीटर लांब सिक्स मारला. त्याचा हा सिक्स पाहून सर्वच थक्क झाले. बटलरच्या पॉवर हिटींगचा या सिक्समुळे अंदाज येऊ शकतो.
जोस बटलरनं 9 फोर आणि 9 सिक्ससह 116 रन केले. त्याचे या सिझनमधील हे तिसरे शतक आहे. बटलरनं मुंबई इंडियन्स विरूद्ध 100 रन करत पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये 103 रनची खेळी केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं शतकी खेळी केली. आयपीएलच्या एका सिझनमध्ये सर्वाधिक 4 शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तो विक्रम मोडण्याची बटलरला आता संधी आहे.
IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरची चालाखी, अॅक्टिंग करत अंपायरला फसवण्याचा प्रयत्न! पाहा VIDEO
आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असून त्यानं सहा शतक झळकावली आहेत. विराट कोहली 5 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शेन वॉटसन आणि जोस बटलर प्रत्येकी 4 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.