मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरची चालाखी, अ‍ॅक्टिंग करत अंपायरला फसवण्याचा प्रयत्न! पाहा VIDEO

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरची चालाखी, अ‍ॅक्टिंग करत अंपायरला फसवण्याचा प्रयत्न! पाहा VIDEO

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये जोरदार ड्रामा झाला.

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये जोरदार ड्रामा झाला.

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये जोरदार ड्रामा झाला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 23 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये जोरदार ड्रामा झाला. दिल्लीच्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये 'नो बॉल' चा वाद झाला. अंपायरच्या निर्णयावर नाराज झालेल्या ऋषभ पंतनं दिल्लीच्या बॅटर्सना परत येण्याचा इशारा केला होता. त्यापूर्वी दिल्लीचा ओपनर डेव्हिड वॉर्नरनंही (David Warner) अंपायरना फसवण्याचा प्रयत्न केला. काय घडला प्रकार? राजस्थाननं दिलेल्या 223 रनचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरूवात केली. पाचव्या ओव्हरमध्ये वॉर्नरनं प्रसिद्ध कृष्णाला सलग दोन फोर लगावले. त्यानंतर आणखी एक मोठा फटका लगावण्याचा वॉर्नरचा प्रयत्न फसला आणि विकेट किपर संजू सॅमसननं त्याचा कॅच घेतला. यावेळी आपण आऊटच झालो नाहीत, अशा थाटात वॉर्नर मैदानात उभा होता. त्यानं बॅटींग करता-करता अ‍ॅक्टिंग करत अंपायरला फसवण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरनं त्या बॉलवर विकेटपासून दूर उभारून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, प्रसिद्ध कृष्णानं ते ओळखून लेग साईडला बॉल  टाकला. त्यामुळे वॉर्नरच्या बॅटला लागून बॉल विकेट किपर संजू सॅमसनकडं गेला. यावेळी वॉर्नर कॅच आऊट असल्याचं कृष्णा, सॅमसनसह सर्वांना माहिती होतं. पण, वॉर्नर त्याची बॅट बॉलला लागलीच नाही, या अविर्भावात उभा होता. त्यानं पृथ्वी शॉला एक रन काढण्यासही नकार दिला. अंपायरनं आऊट दिल्यानंतरही मोठं आश्चर्य व्यक्त करत त्यानं मैदान सोडलं. IPL 2022 : ऋषभ पंतनं सांगितलं रागाचं कारण, संजू सॅमसननंही दिलं उत्तर जोस बटलरचे शतक आणि देवदत्त पडिकलचं अर्धशतक याच्या जोरावर  राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 222 रन केले. त्याला उत्तर देताना दिल्लीची टीम  टीम  8 आऊट 207 रनच करू शकली.राजस्थानने 7 सामन्यांमध्ये 5 वा विजय नोंदवले असून त्याचे 10 पॉईंट्स झाले आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील ही टीम आता पॉईंट टेबलमध्ये  अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्याचवेळी दिल्लीला तितक्याच सामन्यांत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ते 6 पॉईंट्ससह सहाव्या स्थानावर आहे.
First published:

Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022

पुढील बातम्या