Home /News /sport /

IPL 2022 : दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, वाचा कधी खेळणार मॅच

IPL 2022 : दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, वाचा कधी खेळणार मॅच

आयपीएल 2022 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. आयपीएलमधील या निर्णायक टप्प्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) आनंदाची बातमी आहे.

    मुंबई, 15 मे : आयपीएल 2022 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या एकाच टीमनं आत्तापर्यंत 'प्ले ऑफ' मधील जागा निश्चित केली आहे. उर्वरित 3 जागांसाठी 7 टीममध्ये चुरस आहे. या टीमच्या आता उर्वरित प्रत्येक मॅच महत्त्वाच्या आहेत. आयपीएलमधील या निर्णायक टप्प्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) आनंदाची बातमी आहे. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. पृथ्वीला टायफॉईड झाला होता. त्यामुळे तो हॉस्पिचलमध्ये भरती होता. पृथ्वी या आजारपणामुळे मागील 3 सामने खेळू शकला नव्हता. दिल्ली कॅपिटल्सनं ट्विट करत या विषायवरची ताजी माहिती दिली आहे. 'दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर बॅटर पृथ्वी शॉला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्या टायफॉईडचा  उपचार सुरू होता. पृथ्वी आता बरा होत असून हॉटेलमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची मेडिकल टीम त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.'  असं त्यांनी या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना पंजाब किंग्ज विरूद्ध आहे. दिल्लीचे सध्या 12 सामन्यामंतर 12 पॉईंट्स आहेत. 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. पृथ्वी पंजाब विरूद्ध खेळणार का याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. पृथ्वीची सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याला पंजाब विरूद्ध खेळवण्याचा धोका टीम मॅनेजमेंट पत्कारण्याची शक्यता कमी आहे. IPL 2022, GT vs CSK Dram 11 Team Prediction : 'या' खेळाडूंचा करा तुमच्या टीममध्ये समावेश दिल्ली कॅपिटल्सचा शेवटचा सामना शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध आहे. पृथ्वी तोपर्यंत फिट झाला तर मुंबई विरूद्ध नक्की खेळू शकतो. पृथ्वी शॉने या सिझनमधील 9 सामन्यांमध्ये 159.88 च्या स्ट्राईक रेटनं 259 रन केले आहेत. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या जोडीनं दिल्लीला दमदार सुरूवात करून दिली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीनं मनदीप सिंह आणि केएस भरत यांचा प्रयोग केला. पण, हे दोन्ही प्रयोग फसले. भरत राजस्थान विरूद्ध शून्यावरच आऊट झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Prithvi Shaw

    पुढील बातम्या