मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Deepika Padukone-Ranveer Singh विकत घेणार नवी IPL टीम! क्रिकेटपटूनं केलं दोघांना Troll

Deepika Padukone-Ranveer Singh विकत घेणार नवी IPL टीम! क्रिकेटपटूनं केलं दोघांना Troll

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असलेलं दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह (Deepika Padukone-Ranveer Singh) ही जोडी देखील नवी टीम खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचं वृत्त आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्या मॅचनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला नव्या 2 टीमची घोषणा करण्यात येणार आहे. या 2 टीमसाठी 20 जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती आणि बड्या उद्योगसमुहाचा समावेश आहे. लोकप्रिय फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडनं (Manchester United) देखील रस दाखवला आहे. या टीमच्या खरेदीत रस घेणाऱ्या व्यक्तींची नावं आता उघड होत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असलेलं दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह (Deepika Padukone-Ranveer Singh) ही जोडी देखील नवी टीम खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचं वृत्त आहे. या बातमीनंतर टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं या दोघांना ट्रोल केलं आहे. 'या टीमची जर्सी मजेदार असेल,' असं ट्विट कार्तिकनं केलंय. रणवीर सिंह नेहमीच त्याच्या विचीत्र ड्रेसिंगमुळं चर्चेत असतो. त्या संदर्भानं कार्तिकनं हे ट्विट केलं आहे. रणवीर सिंह  आणि दीपिका पादुकोण हे दोघंही त्यांच्या चित्रपटाबरोबरच स्पोर्ट्स फॅन म्हणून प्रसिद्ध आहेत दीपिकी भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी असून ती देखील नॅशनल बॅडमिंटनपटू आहे. तर रणवीर प्रीमियर लीग पासून NBA पर्यंतच्या ग्लोबल लीगचा भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. 135 दिवस मुलीला पाहिलं नाही, मुंबई इंडियन्सच्या दिग्गजानं सोडली टीमची साथ आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. यापूर्वी प्रत्येक टीमला किती खेळाडू रिटेन करता येतील याबबत कोणतीही माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व टीमना जास्तीत जास्त 3 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडू रिटेन करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Deepika padukone, Ipl 2022, Ranveer singh

पुढील बातम्या