मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : हैदराबादला पडली कॅप्टनची चूक महाग, पुढील वाटचाल झाली खडतर

IPL 2022 : हैदराबादला पडली कॅप्टनची चूक महाग, पुढील वाटचाल झाली खडतर

दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) 21 रननं पराभव केला. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे. हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसननं (Kane Williamson) केलेली चूक या पराभवात निर्णायक ठरली.

दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) 21 रननं पराभव केला. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे. हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसननं (Kane Williamson) केलेली चूक या पराभवात निर्णायक ठरली.

दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) 21 रननं पराभव केला. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे. हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसननं (Kane Williamson) केलेली चूक या पराभवात निर्णायक ठरली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) 21 रननं पराभव केला. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे. पाच विजयानंतर फॉर्मात आलेल्या हैदराबादला दिल्ली विरूद्धच्या पराभवानं धक्का बसला आहे. या पराभवानंतर त्यांची पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हैदराबादचे सध्या 10 मॅचनंतर 10 पॉईंट्स आहेत. दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि रोव्हमन पॉवेलच्या (Rovmen Powell) आक्रमक अर्धशतकामुळे हैदराबादचा पराभव झाला.

सनरायझर्स हैदराबादच्या या पराभवात त्यांचा कॅप्टन केन विलियमसनचाही (Kane Williamson) हातभार लागला. 14 व्या ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोर 3 आऊट 135 होता. त्यावेळी उमरान मलिकच्या बॉलिंगवर रोव्हमन पॉवेलचा सोपा कॅच विलियमसननं सोडला. त्यावेळी पॉवेल 14 बॉलमध्ये 18 रन काढून खेळत होता. पॉवेलनं या जीवदानाचा पूर्ण फायदा उठवला. त्यानं पुढील 20 बॉलमध्ये 245 च्या स्ट्राईक रेटनं 49 रन केले. उमरानच्या 20 व्या ओव्हरमध्ये पॉवेलनं 1 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीनं 19 रन काढले.

पॉवेल 67 रन काढून नाबाद राहिला. विलियमसनच्या खराब फिल्डिंगमुळे हैदराबादला 49 रनचा फटका बसला. त्याची ही चूक मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरली. डेव्हिड वॉर्नरनं नाबाद 92 रन काढले. त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. वॉर्नर आणि पॉवेल जोडीनं 11 ओव्हरमध्ये 122 रनची भागिदारी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.

दिल्लीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 186 पर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून फक्त निकोलस पूरनने (Nichoals Pooran) एकाकी झुंज दिली. पूरनने 34 बॉलमध्ये 62 रन केले, यामध्ये 6 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. याशिवाय एडन मार्करम 25 बॉलमध्ये 42 रन करून आऊट झाला. पॉवेलची कॅच सोडणारा विलियमसन बॅटींगमध्येही कमाल करू शकला नाही. तो फक्त 4 रन काढून आऊट झाला.

दिल्लीकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय शार्दुल ठाकूरला 2 विकेट घेण्यात यश आलं. एनरिच नॉर्किया, मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांना 1-1 विकेट मिळाली.

IPL 2022 : वॉर्नरनं उजव्या हातानं बॅटींग करत मारला फोर, भुवनेश्वर कुमार पाहातच राहिला! VIDEO

हैदराबादची वाटचाल खडतर

सनरायझर्स हैदराबादनं सलग पाच विजयासह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर धडक मारली होती. पण, सलग तिसऱ्या मॅचमधील पराभवानंतर त्यांची आता सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गुजरात टायटन्सनं त्यांचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि आता दिल्ली कॅपिटल्सनंही त्यांना पराभूत केलं आहे. हैदराबादची मजबूत समजली जाणारी बॉलिंग सलग तिसऱ्या मॅचमध्ये अपयशी ठरली आहे. त्यामुळे हैदराबादची 'प्ले ऑफ' मधील वाटचाल खडतर बनली आहे. त्यांना आता प्ले ऑफ गाठण्यासाठी आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सचा अडथळा दूर करावा लागणार आहे.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, SRH