मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: 'आता 60 रन पुरेसे नाहीत', डेव्हिड वॉर्नरनं सांगितली मुलींची तक्रार

IPL 2022: 'आता 60 रन पुरेसे नाहीत', डेव्हिड वॉर्नरनं सांगितली मुलींची तक्रार

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्यानं या आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतक झळकावली आहेत. त्यानंतरही वॉर्नरच्या मुली त्याच्या खेळावर खूश नाहीत.

    मुंबई, 21 मार्च : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्यानं या आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतक झळकावली आहेत. पंजाब किंग्ज (Punjab Kings)  विरूद्ध  बुधवारी झालेल्या मॅचमध्ये वॉर्नरनं नाबाद 60 रनची खेळी केली. वॉर्नरच्या सध्याच्या खेळावर त्याच्या मुली खूश नाहीत. स्वत: वॉर्नरनंच हा खुलासा केलाय. वॉर्नरची पत्नी आणि मुली आयपीएलसाठी भारतात आल्या आहेत. त्या दिल्लीच्या प्रत्येक मॅचच्या वेळी स्टेडिअममध्ये उपस्थित असतात. 'मी शतक का करत नाही? असा प्रश्न माझ्या मुलींना पडला आहे. हे सोप नाही, सध्या 60 रन पुरेसे नाहीत. त्यांनी जोस बटलरची बॅटींग पाहिली आहे. त्यानंतर त्या मला तुम्ही बटलरसारखे मैदानाच्या बाहेर बॉल का मारत नाही? असा प्रश्न विचारतात. लहान मुलंही मॅच पाहात आहेत, ही चांगली गोष्ट आहे.' असा खुलासा वॉर्नरनं पंजाब किंग्ज विरूद्धची मॅच झाल्यानंतर केला आहे. राजस्थान रॉयल्सचा जोस बटलरनं (Jos Buttler) या सिझनमधील 6 मॅचमध्ये 375 रन केले आहेत. यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. त्याची या स्पर्धेतील सरासरी 75 असून स्ट्राईक रेट 156.90 इतका आहे. सर्वाधिक रन काढण्यासाठी मिळणाऱ्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्येही बटलर इतरांपेक्षा खूप पुढं आहे. डेव्हिड वॉर्नरनं यावेळी बोलताना दिल्लीच्या विजयाचं श्रेय बॉलर्सना देखील दिलं. 'माझ्या मते बॉलर्सनी दमदार खेळ करत आमचं काम सोपं केलं. आम्ही 'पॉवर प्ले' मध्ये आक्रमक खेळ केला. यापूर्वीच्या मॅचपेक्षा ते पिच वेगळे होते. पण, याचे सर्व श्रेय बॉलर्सना जाते,' असंही वॉर्नरनं सांगितलं. IPL 2022, MI vs CSK : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने, कशी असेल Playing11? दिल्ली कॅपिटल्सच्या भेदक बॉलिंगपुढे पंजाब किंग्जची संपूर्ण इनिंग 115 रनवर ऑल आऊट झाली. हा या सिझनमधील कोणत्याही टीमचा सर्वात कमी स्कोअर आहे. त्यानंतर वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ने 6.3 ओव्हर्समध्ये 83 रनची भागिदारी करत दिल्लीला दमदार सुरूवात करून दिली. आता दिल्लीची पुढील लढत शुक्रवारी जोस बटलरच्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022

    पुढील बातम्या