Home /News /sport /

IPL 2022: दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मुलींनी घेतली वॉर्नरची 'शाळा', बाबांना विचारला नेमका प्रश्न

IPL 2022: दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मुलींनी घेतली वॉर्नरची 'शाळा', बाबांना विचारला नेमका प्रश्न

डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) सर्वात जास्त 432 रन केले. या कामगिरीनंतरही वॉर्नरच्या मुली त्याच्यावर नाराज आहेत.

    मुंबई, 27 मे : डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) सर्वात जास्त 432 रन केले. या कामगिरीनंतरही वॉर्नरचं घरी अपेक्षेप्रमाणे स्वागत झालं नाही. उलट घरी गेल्यानंतर मुलींनी वॉर्नरची शाळा घेतली. ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर 'फॉक्स न्यूज' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वत: वॉर्नरनंच हा अनुभव सांगितला आहे. वॉर्नरनं या आयपीएल सिझनमध्ये पाच अर्धशतक झळकाले पण त्याला एकही शतक झळकावता आले नाही. त्यामुळे तीन्ही मुलींनी वॉर्नरला सुनावलंय. वॉर्नरनं या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'हे खरोखरच कठीण होते. मी घरी गेल्यावर रोज मला मुली आयपीएलमध्ये शतक का झळकावलं नाही? शतक झळकावणं इतकं सोपं नसतं,हे मी त्यांना कसं सांगू?' वॉर्नरची पत्नी कँडीसनंही मुलींची आठवण सांगितली, 'मुलींना डेव्हिड (वॉर्नर) आऊट झालेलं आवडत नाही. त्यानंतर त्याची समजूत काढणे अवघड जातं. त्यानं शतक केलं नसलं तरी टीमसाठी महत्त्वाची इनिंग खेळली, असं मी त्यांना समजावते. पण, डेव्हिडनं प्रत्येक मॅचमध्ये शतक करावं, अशी मुलींची इच्छा असते.' IPL 2022 : 'मला पाहणं बंद कर आणि बॉलिंग कर,' CSK च्या सदस्यानं सांगितला धोनीचा अनुभव आयपीएल 2022 मध्ये वॉर्नरनं चांगली बॅटींग करूनही दिल्ली कॅपिटल्सला 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करता आलेली नाही. दिल्लीला शेवटच्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यापूर्वी मागील दोन्ही वर्ष दिल्लीनं 'प्ले ऑफ' मध्ये जागा मिळवली होती. आयपीएल 2020 मध्ये तर दिल्लीनं फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं त्यांचा फायनलमध्ये पराभव केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022

    पुढील बातम्या