मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: विराट कोहलीचा कॅप्टन होणार 'या' आयपीएल टीमचा हेड कोच!

IPL 2022: विराट कोहलीचा कॅप्टन होणार 'या' आयपीएल टीमचा हेड कोच!

आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीमचा समावेश होणार आहे. या दोन्ही टीमनी स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीमचा समावेश होणार आहे. या दोन्ही टीमनी स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीमचा समावेश होणार आहे. या दोन्ही टीमनी स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 डिसेंबर: आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीमचा समावेश होणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन शहरांच्या त्या टीम असून त्यांची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) या दोन्ही टीमा प्रत्येकी 3 खेळाडू ड्राफ्टमधून निवडता येणार आहेत. त्याचबरोबर या टीमचे हेड कोच कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लखनऊ फ्रँचायझीच्या टीमचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) होणार अशी चर्चा आहे. तर या टीमच्या हेड कोच पदासाठी 2 नावं आघाडीवर असून यापैकी एक नाव विराट कोहलीच्या (Virat Kohli) माजी कॅप्टनचं आहे.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा माजी कॅप्टन आणि न्यूझीलंडचा ऑल राऊंडर डॅनिएल व्हिटोरी (Daniel Vettiori) याचं नाव हेड कोच पदासाठी आघाडीवर आहे. त्याला इंग्लंड टीमचे माजी हेड कोच अँडी फ्लॉवरचे (Andy Flower) आव्हान आहे. टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन आणि सनरायझर्स हैदराबादचे ट्रेवर बेलिस यांचीही नावं चर्चेत होती, पण त्यांचा फायनल लिस्टमध्ये समावेश झालेला नाही.

अँडी फ्लॉवर यांनी यापूर्वी केएल राहुलसोबत काम केले आहे. फ्लॉवर हे पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचे असिस्टंट कोच होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर फ्लॉवर यांना जगभरातील टी20 लीगमधील टीमचा हेड कोच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

IND vs NZ: मयंक अग्रवालनं सांगितलं शतकाचं रहस्य, 2 दिग्गजांना दिलं यशाचं श्रेय

कोणत्या खेळाडूंची होणार निवड?

लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबादच्या (Ahmadabad) टीम प्रत्येकी 3-3 खेळाडू रिटेन करतील, यानंतर जानेवारी महिन्यामध्ये उरलेल्या खेळाडूंसाठी लिलाव होणार आहे. केएल राहुल, राशिद खान, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, इशान किशन आणि डेव्हिड वॉर्नर हे 6 खेळाडू दोन नव्या टीमकडे जातील, असा दावा आकाश चोप्राने केला आहे. आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनलवर हे मत मांडलं आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Virat kohli