Home /News /sport /

IPL 2022 : SRH ला पुन्हा चॅम्पियन करण्यासाठी दिग्गज खेळाडू टीममध्ये परतणार!

IPL 2022 : SRH ला पुन्हा चॅम्पियन करण्यासाठी दिग्गज खेळाडू टीममध्ये परतणार!

आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादसाठी (SRH) मागील सिझन चांगलाच निराशाजनक ठरला.. कॅप्टन बदलल्यानंतरही त्यांना शेवटचा क्रमांक टाळता आला नाही. आता हैदराबादच्या टीमनं 2016 प्रमाणे पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याची तयारी सुरू केली आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादसाठी (SRH) मागील सिझन चांगलाच निराशाजनक ठरला. त्यांना 14 पैकी फक्त 3 मॅच जिंकता आल्या होत्या. स्पर्धा सुरू असताना डेव्हिड वॉर्नरला (David Warner) कॅप्टन पदावरून काढण्याचा त्यांचा निर्णय देखील चांगलाच वादग्रस्त ठरला. कॅप्टन बदलल्यानंतरही त्यांना शेवटचा क्रमांक टाळता आला नाही. आता हैदराबादच्या टीमनं 2016 प्रमाणे पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याची तयारी सुरू केली आहे. सनरायझर्स हैदराबाद पुढील सिझनसाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फास्ट बॉलर डेल स्टेनला (Dale Steyn) बॉलिंग कोच म्हणून कराबद्ध करणार आहे. 'क्रिकबझ' ने दिलेल्या वृत्तानुसार स्टेन आणि हैदराबाद यांच्यातील बोलणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटच्या क्षणी ही बोलणी काही कारणांमुळे फिसकटली नाही, तर पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल. स्टेननं यावर्षीच ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आयपीएल स्पर्धेत एकूण 95 मॅच खेळल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लॉयन्स या टीमचं स्टेननं प्रतिनिधत्न केलं आहे. टॉम मूडी हे सनराझर्स हैदराबादचे कोच असून तो त्यांच्यासोबत पुढील सिझनमध्ये काम करणार आहे. या प्रकरणात काहीही बोलण्यास स्टेननं  'क्रिकबझ' ला नकार दिला आहे. डेल स्टेननं त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमदध्ये 93 टेस्टमध्ये 439 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर 125 वन-डे मध्ये 196 आणि 47 टी20 इंटरनॅशनलमध्ये 64 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तो आयपीएल 2020 मध्ये (IPL 2020) आरसीबीकडून खेळला होता.| Ashes Series : बटलर बनला 'सुपर मॅन', जबरदस्त कॅच घेत सर्वांना केले थक्क! VIDEO 'क्रिकबझ' च्या वृत्तानुसार टीम इंडियाचा माजी बॅटर हेमांग बदानी देखील हैदराबाद टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार आहे. हैदराबादचा मेंटॉर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक बनला आहे. तर माजी हेड कोच ट्रेवर बेलिस आणि बॅटींग कोच ब्रॅड हॅडीन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हैदराबादच्या कोचिंग स्टाफमध्येही सध्या जागा आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, SRH

    पुढील बातम्या