मुंबई, 9 मे : दिल्ली कॅपिटल्सचा रविवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध (Delhi Capitals vs Chennai Super Kings) 91 रननं पराभव झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीच्या टीमनं सर्वच आघाड्यांवर निराशा केली. त्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. दिल्लीच्या या पराभवानंतर कॅप्टन ऋषभ पंतवर (Rishbah Pant) टीका होत आहे. पंतनं मॅचच्या दरम्यान केलेल्या बॉलिंगमधील बदलांवर टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनं टीका केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) या पराभवानंतर कॅप्टनचा बचाव केला आहे. 'मी पंतनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाशी सहमत आहे. मी टी20 टीमची कॅप्टनसी केलीय. या प्रकारात विशेषत: दबावामध्ये असताना निर्णय घेणे अवघड आहे. बाहेर बसून सल्ला देणं सोपं आहे,' असं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं.
पॉन्टिंगनं यावेळी प्रत्येक प्रकारात दिल्लीनं चेन्नईपेक्षा खराब खेळ केल्याचं मान्य केलं. 'आमची बॉलिंग चांगली झाली नाही. आम्ही बॅटींग खराब केली. या मॅचमध्ये आमच्यासाठी फारशा सकारात्मक गोष्टी झाल्या नाहीत. फक्त खलिल अहमदनं चांगली कामगिरी केली. आमचा 91 रननं पराभव झाला आहे. त्यामुळे नेट रनरेटवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी लढतीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आम्ही आणखी तीन सामने जिंकलो तर प्ले ऑफ मध्ये जाऊ. एका मोठ्या विजयानंतर आमच्या नेट रनरेटमध्ये सुधारणा होईल, आम्ही फायनलमध्येही जाऊ', असा विश्वास पॉन्टिंगनं व्यक्त केला.
IPL 2022 : खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटचे गावसकरांनी टोचले कान, म्हणाले....
दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनंही मॅचनंतर बोलताना सीएसकेनं सरस खेळ केल्याचं मान्य केलं. 'त्यांनी सर्व विभागात आम्हाला मागे टाकले. आता आम्हाला पुढील तीन मॅचवर लक्ष केंद्रीत करणे आमच्या हातामध्ये आहे. या मॅच आम्ही जिंकल्या तर क्वालिफाय करू.' असा विश्वास व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.