मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मोठ्या विजयानंतर CSK 'प्ले ऑफ' मध्ये जाणार का?, वाचा धोनीचं उत्तर

IPL 2022 : मोठ्या विजयानंतर CSK 'प्ले ऑफ' मध्ये जाणार का?, वाचा धोनीचं उत्तर

फोटो - iplt20.com

फोटो - iplt20.com

चेन्नई सुपर किंग्सनं रविवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Chennai Super Kings vs Delhi Capitals) 91 रननं पराभव केला. या निकालानंतर 'प्ले ऑफ' ची चुरस वाढली असून सीएसकेच्या आशा अजूनही कायम आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 मे : चेन्नई सुपर किंग्सनं रविवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Chennai Super Kings vs Delhi Capitals) 91 रननं पराभव केला. या निकालानंतर 'प्ले ऑफ' ची चुरस वाढली असून सीएसकेच्या आशा अजूनही कायम आहेत. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) या शक्यतेवर मत व्यक्त केलं आहे. 'या प्रकराचा विजय यापूर्वी मिळाला असता तर चागलं झालं असतं,' अशी भावना धोनीनं मॅचनंतर बोलताना व्यक्त केली. त्यानंतर त्यानं टीमच्या पुढील वाटचालीबाबत मत व्यक्त केले.

सीएसकेचे आता 11 मॅचनंतर 8 पॉईंट्स झाले आहेत. त्यांच्या अद्याप मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरूद्धच्या मॅच बाकी आहेत. सीएसकेला 'प्ले ऑफ' मध्ये जाण्यासाठी या तीन्ही मॅच चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक असून अन्य निकालांवरही अवलंबून राहानं लागणार आहे. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये टॉप 4 मध्ये असणाऱ्या  दोन टीमचे सध्या 16 पॉईंट्स असून दोन टीमचे 14 पॉईंट्स आहेत.

दिल्लीवरील विजयानंतर धोनीनं सांगितलं की, 'मी गणितामधील तज्ज्ञ नाही. शाळेतही तो माझा चांगला विषय नव्हता. नेट रनरेटचा विचार करून काही फायदा नाही. दोन अन्य टीम खेळत असताना तुम्हाला दबावामध्ये किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही. पुढच्या मॅचमध्ये काय करता येईल याचा विचार करायला हवा. आम्ही 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला तर चांगली गोष्ट आहे. आम्ही केला नाही तरी जग समाप्त होणार नाही.'

IPL 2022 : CSK च्या विजयानंतर धोनीनं सांगितली 'मन की बात', फॅन्सच्या व्यक्त केल्या भावना

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये झालेल्या मॅचमध्ये सीएसकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 208 रन केले. डेव्हॉव कॉनवेनं 49 बॉलमध्ये 87 रनची खेळी केली. या खेळीत त्यानं 7 फोर आणि 5  सिक्स लगावले. ऋतुराज गायकवाड 41 आणि शिवम दुबेनं 32 रन काढले.  209 रनचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची टीम 17.4 ओव्हर्समध्ये 117 रनवर ऑल आऊट झाली. सीएसकेकडू मोईन अलीनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, Ipl 2022, MS Dhoni