Home /News /sport /

IPL 2022 : हार्दिक पांड्या होणार अहमदाबादचा कॅप्टन, वाचा किती मिळणार रक्कम

IPL 2022 : हार्दिक पांड्या होणार अहमदाबादचा कॅप्टन, वाचा किती मिळणार रक्कम

गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) लॉटरी लागली आहे. गुजरातचा हा ऑल राऊंडर अहमदाबाद टीमचा (Ahmedabad Team) कॅप्टन असेल

    मुंबई, 22 जानेवारी :  गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) लॉटरी लागली आहे. गुजरातचा हा ऑल राऊंडर अहमदाबाद टीमचा (Ahmedabad Team) कॅप्टन असेल. टीमचे संचालक विक्रम सोळंकी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. अहमदाबाद शहराची टीम या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे. हार्दिकसह राशिद खान (Rashid Khan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या क्रिकेटपटूंनाही अहमदाबादने करारबद्ध केले आहे. अहमदाबाद टीमचे संचालक विक्रम सोळंकी यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली. 'हार्दिक पांड्या अहमदाबाद टीमचा कॅप्टन असेल हे सांगायला मला आनंद होत आहे. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. अहमदाबादकडून खेळताना त्याच्या या अनुभवाचा टीमला फायदा होईल, अशी आशा आहे. हार्दिक खूप उत्साही असून तो टीममध्ये नवी एनर्जी आणेल,' असं सोळंकी यांनी स्पष्ट केले. हार्दिक आणि राशिदचा पगार सारखा हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आले असल्याचं सोळंकी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा स्टार बॉलर राशिद खानवरही इतकेच पैसे खर्च करण्यात आले आहेत. शुभमन गिलला 8 कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. गिल यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत होता. तर राशिद सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सदस्य होता. IPL 2022 : KL राहुल ठरला सर्वात महागडा खेळाडू, विराट-रोहितपेक्षाही मिळणार जास्त पगार हार्दिकनं टीमचा कॅप्टन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'मी नव्या आयपीएल टीमबाबत उत्साहित आहे. मला मॅनेजमेंटनं कॅप्टन केलं हा खूप मोठा सन्मान आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मी राशिद खान आणि शुभमन गिल या दोघांनाही जवळून ओळखतो. त्यांचे स्वागत आहे. हे दोघंही खूप चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या आगमनाने टीम चांगली होईल.' टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे हेड कोच गॅरी कस्टर्न अहमदाबादच्या टीममध्येही हीच भूमिका बजावतील. तर टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा अहमदाबादचा बॉलिंग कोच असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hardik pandya, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या