मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स बनला पेन्शनर्स क्लब, महेंद्रसिंह धोनी काय घेणार निर्णय?

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स बनला पेन्शनर्स क्लब, महेंद्रसिंह धोनी काय घेणार निर्णय?

वेस्ट इंडिजचा महान ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आज (रविवारी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमधील शेवटची मॅच खेळणार आहे.

वेस्ट इंडिजचा महान ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आज (रविवारी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमधील शेवटची मॅच खेळणार आहे.

वेस्ट इंडिजचा महान ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आज (रविवारी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमधील शेवटची मॅच खेळणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 नोव्हेंबर: वेस्ट इंडिजचा महान ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आज (रविवारी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमधील शेवटची मॅच खेळणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेनं वेस्ट इंडिजचा 20 रननं पराभव केला आणि त्यांची स्पर्धेत पुनरागमन करण्याची सर्व आशा संपुष्टात आली. या पराभवानंतर ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ब्राव्होच्या रिटायरमेंटनंतर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीममधील निवृत्त खेळाडूंच्या संख्येत आणखी एकाची भर पडली आहे. या आयपीएल स्पर्धेचं (IPL 2021) विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसके (CSK) टीममधील ब्राव्हो हा सहावा निवृत्त खेळाडू आहे.

चेन्नईच्या टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यापूर्वी वर्षभर तो क्रिकेटपासून दूर होता. आता धोनी फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. धोनीचा सहकारी आणि चेन्नईचा प्रमुख बॅटर असलेला सुरेश रैनानं (Suresh Raina) धोनीसोबतच निवृत्ती जाहीर केली आहे. रैना 2018 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. क्रिकेटपासून दूर राहिल्याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला आहे. या आयपीएलमध्ये शेवटच्या टप्प्यात रैना टीमच्या बाहेर होता.

या आयपीएल स्पर्धेची फायनल (IPL 2021 Final) गाजवणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिस (Faf du Plesiss) देखील यावर्षी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. फाफ सध्या जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळणारा फ्रि लान्सर खेळाडू आहे. या टी20 वर्ल्ड कपच्या टीमची निवड करताना त्याच्याकडं क्रिकेट दक्षिण आफ्रिकानं (Cricket South Africa) दुर्लक्ष केलं होतं. चेन्नईकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी लेग स्पिनर इम्रान ताहीरनं (Inran Tahir) 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर केली होती. तो टी20 क्रिकेट खेळण्यासाठी अद्यापही उपलब्ध आहे. पण, मागच्या दोन वर्षांपासून आफ्रिकेनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आहे. सध्या सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप गाजवणारा इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीनं देखील याचवर्षी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

टीम इंडियाला दिग्गज खेळाडू देणारे महान कोच तारक सिन्हा यांचे निधन

पुढील आयपीएल सिझनपूर्वी (IPL 2022) खेळाडूंचं मेगा ऑक्शन (IPL 2022 mega auction) होणार आहे. दोन नव्या टीम देखील आयपीएलमध्ये येणार असून खेळाडूंना रिटेन करण्याचे नियम देखील बदलणार आहेत. त्या परिस्थितीमध्ये महेंद्रसिंह धोनी पुढच्या सिझनसाठी या पेन्शनर्स क्लबमधील किती खेळाडूंना रिटेन करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील 10 वर्षांचा विचार करत टीमची बांधणी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या पेन्शनर्स क्लबमधील अनेक क्रिकेटपटू येत्या सिझनमध्ये चेन्नईच्या यलो जर्सीमध्ये  न दिसण्याची शक्यता दाट आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni