मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Deepika Padukone-Ranveer Singh खरेदी करणार IPL टीम! शाहरूख, प्रीतीला देणार टक्कर

Deepika Padukone-Ranveer Singh खरेदी करणार IPL टीम! शाहरूख, प्रीतीला देणार टक्कर

आयपीएलच्या 2 नव्या टीमसाठी 20 जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती आणि बड्या उद्योगसमुहाचा समावेश आहे. या  खरेदीत रस घेणाऱ्या व्यक्तींची नावं आता उघड होत आहेत. बॉलिवूडच्या एका पॉवरफुल कपलचाही (Bollywood Powerful Couple) यात समावेश आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 ऑक्टोबर: संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष सध्या यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपकडं (T20 World Cup 2021) लागलं आहे. या वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील सामने आता संपत आले असून शनिवारपासून मुख्य फेरीला सुरूवात होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला रविवारी होणार असून त्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या सर्व धामधुमीत बीसीसीआयनं आयपीएलच्या सिझन 15 साठी (IPL 2022) तयारी सुरू केली आहे. आगामी आयपीएलमध्ये दोन नव्या टीम दाखल होणार असून त्यामुळे एकूण टीमची संख्या 10 होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्या मॅचनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला नव्या 2 टीमची घोषणा करण्यात येणार आहे. या 2 टीमसाठी 20 जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती आणि बड्या उद्योगसमुहाचा समावेश आहे. लोकप्रिय फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडनं (Manchester United) देखील रस दाखवला आहे. या टीमच्या खरेदीत रस घेणाऱ्या व्यक्तींची नावं आता उघड होत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या एका पॉवरफुल कपलचाही (Bollywood Powerful Couple) समावेश आहे. आयपीएल आणि बॉलिवूडचं नातं जूनं आहे. शाहरूख खान (Shahrukh khan) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्या मालकीच्या कोलकाता नाईट नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) टीमनं दोन वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. यावेळी झालेल्या आयपीएल स्पर्धेची (IPL 2021) ही टीम उपविजेती होती. तर प्रीती झिंटा (Preity Zinta) यांची पंजाब किंग्ज (Punjab Kings) देखील पहिल्या सिझनपासून आयपीएलमध्ये खेळत आहे 'आऊटलूक' नं दिलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडमधील पॉवर कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) नव्या आयपीएल टीमसाठी बोली लावणार आहेत. हे दोघंही त्यांच्या चित्रपटाबरोबरच स्पोर्ट्स फॅन म्हणून प्रसिद्ध आहेत दीपिकी भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी असून ती देखील नॅशनल बॅडमिंटनपटू आहे. तर रणवीर प्रीमियर लीग पासून NBA पर्यंतच्या ग्लोबल लीगचा भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडची होणार IPL 2022 मध्ये एन्ट्री? दीपिका-रणवीर हे दोघंच नव्या टीमसाठी बोली लावणार की त्यांच्यासोबत अन्य भागीदार आहेत. तसंच ते कोणत्या शहराच्या टीमसाठी बोली लावणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरपीएसजी ग्रुपचे संजीव गोयंका, ऑरोबिंदो फार्मा, टोरेंट फार्मास्युटिकल्स, ब्रॉडकास्ट ऍण्ड स्पोर्ट्स कन्सलटिंग एजन्सीज आयटीडब्ल्यू, ग्रुप एम, सिंगापूरची प्रायव्हेट इक्विटी फर्म आणि इतर काही कंपन्यांनी टेंडर विकत घेतली आहेत.
First published:

Tags: Deepika padukone, Ipl 2022, Ranveer singh

पुढील बातम्या