• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, 'या' फ्रँचायझीची BCCI कडं मागणी

IPL टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, 'या' फ्रँचायझीची BCCI कडं मागणी

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. पुढील सिझनच्या मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) तयारी सध्या सुरू आहे. त्यापूर्वी बीसीसीआयला (BCCI) एक क्रांतिकारक प्रस्ताव देण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: इंडियन प्रीमिअर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये क्रिकेटपटूंची भरपूर कमाई होते. त्यामुळे अनेक जण नॅशनल टीमपेक्षाही आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देतात. पुढील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीम सहभागी होणार असून त्यामुळे स्पर्धेतील टीमची एकूण संख्या 10 होणार आहे. पुढील सिझनच्या मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) तयारी सध्या सुरू आहे. त्यापूर्वी बीसीसीआयला (BCCI) एक क्रांतिकारक प्रस्ताव देण्यात आला आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) फ्रँचाझीचे सहमालक नेस वाडीया (Ness Waida) यांनी हा प्रस्ताव बीसीसीआला दिला असून त्याची अंमलबजावणी झाल्यास आयपीएलचं स्वरूप पूर्ण बदलणार आहे. 'विदेशातील ज्या शहरांमध्ये भारतीयांची संख्या जा्त आहे, त्या शहरात खेळाडूंची उपलब्धता पाहून ऑफ सिझनमध्ये 3 ते 5 मॅच घेण्यात यावा असा प्रस्ताव वाडीयांनी सादर केवा आहे. दरवर्षी टॉप 4 टीमना मियामी, सिंगापूर किंवा टोरंटो या शहरांमध्ये काही सामने खेळण्याची परवानगी देण्यात यावी. यामुळे आयपीएलचा ब्रँड आणखी मजबूत होईल. खेळ आता व्यवसाय बनला आहे. टी20 लीग यासाठी योग्य आहे. आपल्याला हा टप्पा गाठण्यासाठी 14 वर्ष लागली आहेत. पण, अखेर हे झालं याचा मला आनंद आहे.' असं वाडीया यांनी सांगितलं. खेळाडूंना सातत्यानं बायो-बबलमध्ये राहवं लागत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. यामुळे खेळाडूंना येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक थकव्याकडं लक्ष दिलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. युजवेंद्र चहलच्या पत्नीनं RCB ला नाचवलं, विराट ते ABD पर्यंत सारे सहभागी! पाहा VIDEO आयपीएलमध्ये आता 2 नव्या टीम सहभागी झाल्या आहेत. अहमदाबाद टीमसाठी सीव्हीसी कॅपिटलनं (CVC Capital) 5625 कोटींची बोली लावली. तर, लखनऊ टीमला आरपी संजीव गोयंका ग्रुपनं (RP Sanjiv Goenka Group) 7090 कोटींना खरेदी केलं. या व्यवहारातून बीसीसीआयला 12,715 कोटींची कमाई झाली आहे. आता पुढील सिझनमध्ये 60 ऐवजी 74 मॅच होणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: