• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022 Auction: नव्या आयपीएल टीमची घोषणा होताच गांगुली वादात, वाचा काय आहे प्रकरण

IPL 2022 Auction: नव्या आयपीएल टीमची घोषणा होताच गांगुली वादात, वाचा काय आहे प्रकरण

संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्या ग्रुपला लखनऊची फ्रँचायझी मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) वादात अडकले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑक्टोबर: दुबईमध्ये सोमवारी झालेल्या लिलावात आयपीएल 2022 मधील नव्या टीम (IPL 2022 Auction) ठरल्या आहेत. लखनऊच्या (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) या दोन टीम पुढील आयपीएल लिलावात उतरणार आहेत. लखनऊच्या फ्रँचायझींचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) आहेत. त्यांच्या आरपीएसजी ग्रुपने (RPSG) लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. गोयंका यांच्या ग्रुपला लखनऊची फ्रँचायझी मिळाल्याचं जाहीर झाल्यानंतर बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) वादात अडकले आहेत. यापूर्वी गोयंका यांच्याकडं 2016 आणि 2017 साली आयपीएलमधील पुणे टीमची मालकी होती. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमवर दोन वर्षांची बंदी होती. गोयंका हे इंडियन सुपर लीगमधील एटीके-मोहन बागान टीमचे सहमालक आहेत. गांगुली त्यांच्या टीममध्ये सहभागी आहे. गांगुलींचा या टीममधील संचालक मंडळात सहभाग असून संजीव गोयंका याचे संचालक आहेत. संजीव गोयंका यांनी CNBC टीव्ही 18 शी बोलताना या विषयावर बोलताना त्यांची बाजू मांडली आहे. 'माझ्या मते गांगुली यांनी एटीके मोहन बागान टीमशी नातं पूर्णपणे तोडायला हवं,' असं त्यांनी सांगितलं. हे कधी होणार असा प्रश्न त्यांना विचाल्यानंतर मला वाटतं हे आजच होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत 'या निर्णयाची घोषणा कधी करायची हे सर्वस्वी सौरववर आहे. माफ करा मी माझा अंदाज सांगितला.' अशी प्रतिक्रिया दिली. IPL 2022 संदर्भातील मोठी बातमी! अहमदाबादची टीम खरेदी करणारा CVC ग्रुप संशयात, BCCI करणार कारवाई? अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा शहरांमध्ये आयपीएलच्या नव्या टीमसाठीची स्पर्धा होती. प्रसिद्ध फूटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे मालक, अडानी ग्रुप (Adani Group), कोटक ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा या कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. या सर्व कंपन्यांमध्ये गोयंका यांनी सर्वाधिक बोली लावत लखनऊच्या टीमची खरेदी केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: