Home /News /sport /

'मी नव्या घरात..' KL Rahul बरोबरच्या लग्नाच्या चर्चेवर आथिया शेट्टीचं स्पष्टीकरण!

'मी नव्या घरात..' KL Rahul बरोबरच्या लग्नाच्या चर्चेवर आथिया शेट्टीचं स्पष्टीकरण!

बॉलिवूड अभिनेत्री आशिया शेट्टी (Athiya Shetty) टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

    मुंबई, 7 मे : बॉलिवूड अभिनेत्री आशिया शेट्टी (Athiya Shetty) टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या जोडीनं वांद्रेमधील क्वार्टर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये 4BHK अपार्टमेंट रेंटवर घेतल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालो होतं. या बातमीवर आथियानं मौन सोडलं आहे. मी राहुलसोबत या घरात राहयला जाणार नसल्याचं आथियानं (Athiya Shetty is not moving into new home with KL Rahul) स्पष्ट केलं. आथिया शेट्टीनं रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) शेजारी नवीन घर घेतलं आहे. आथिया या घरामध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत शिफ्ट होणार असल्याचं मानलं जात होतं. त्यावर अभिनेत्रीनं सत्य सर्वांसमोर मांडलं आहे. आथिया कुणासोबत राहणार? 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना आथियानं सांगितलं की, 'मी अन्य कुणासोबत नाही तर माझ्या आई-वडिलांसोबत नव्या घरात शिफ्ट होणार आहे. मी तिथं माझ्या कुटुंबासोबत राहणार आहे. आथिया सध्या तिचे आई-वडील आणि भाऊ अहानसोबत दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंड रोडवरील घरामध्ये राहत आहे. लग्नाबद्दल म्हणाली... राहुलसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चेलाही आथियानं यावेळी उत्तर दिलं. 'मी या विषयावर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. मला या सर्वांचा कंटाळा आला आहे. मी आता फक्त या विषयावर हसते. याबाबत लोकं काय विचार करतात तो त्यांचा प्रश्न आहे. मीडिया रिपोर्टनुसार वांद्रे भागातील क्वार्टर रोडवर आथियानं सी फेसिंग 4BHK अपार्टमेंट घेतले आहे. हे अपार्टमेंट 8 व्या मजल्यावर असून याचं भाडं 10 लाख रूपये आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्स जिंकताच हार्दिकच्या नताशाचा चेहरा पडला, तर रितिका.... VIDEO आथिया शेट्टीनं 2015 साली सूरज पांचोलीच्या 'हिरो' या सिनेमानं बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली. तिचा 'मोतीचूर चकनाचूर' हा शेवटचा चित्रपट  2019 साली प्रदर्शित झाला होता. आथिया सध्या दोन नव्या प्रोजेक्टवर काम करत असून त्यांची  लवकरच घोषणा होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, Cricket news, Kl rahul

    पुढील बातम्या