Home /News /sport /

IPL 2022 : 'या' दिग्गजाच्या हस्तक्षेपानंतर पंतनं बदलला निर्णय, दिल्लीच्या डग आऊटमधील Inside Story

IPL 2022 : 'या' दिग्गजाच्या हस्तक्षेपानंतर पंतनं बदलला निर्णय, दिल्लीच्या डग आऊटमधील Inside Story

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishbah Pant) खेळाडूंना परत बोलवण्याचा निर्णय घेतला होता. पंतनं डग आऊटमधून इशारा केल्यानं एक वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला होता.

    मुंबई, 23 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये जोरदार वाद झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरच्या निर्णयावर सुरू झालेला वाद इतका वाढला की दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishbah Pant) खेळाडूंना परत बोलवण्याचा निर्णय घेतला होता. पंतनं डग आऊटमधून इशारा केल्यानं एक वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला होता. या नाजूक परिस्थितीमध्ये दिल्लीच्या डग आऊटमधील दिग्गजानं हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला. काय घडले प्रकरण? राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 222 रन केले होते. दिल्लीला शेवटच्या ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 36 रनची गरज होती. रोव्हमन पॉवेलनं ओबेड मेकॉयच्या पहिल्या दोन बॉलवर सिक्स लगावात मॅचमध्ये रंगत वाढवली. त्यानं तिसऱ्या बॉलवरही सिक्स लगावाला आणि वाद सुरू झाला. मकॉयनं टाकलेला बॉल हा नो बॉल असल्याचं डगआऊटमध्ये बसलेल्या संपूर्ण दिल्ली टीमचं मत होतं. त्यांनी नो बॉलचा निर्णय थर्ड अंपायरकडे देण्याची मागणी केली. मैदानातील अंपायर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे वाद आणखी चिघळला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत यावेळी चांगलाच नाराज झाला होता. त्याने मैदानात बॅटींग करत असलेल्या खेळाडूंना परत येण्याचा इशारा केला. दिल्लीचे असिस्टंट कोच प्रवीण आम्रे यांनी यावेळी मैदानात धाव घेत अंपायरचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण चांगलंच चिघळल्याचं लक्षात येताच दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसननं (Shane Watson) या प्रकरणात हस्तक्षेप केला. रोव्हमन पॉवेल आणि कुलदीप यादव पंतच्या सुचनेनंतर परत येत असल्याचं पाहून वॉटसन पंत जवळ गेला. त्यानं पंतची कानउघाडणी केली. पंतनंही वॉटसनचं बोलणं ऐकूण घेतलं आणि त्यानंतर त्यानं खेळाडूंना परत बोलवण्याचा निर्णय रद्द केला. वॉटसननं दिलं स्पष्टीकरण शेन वॉटसननं या मॅचनंतर त्याची भूमिका स्पष्ट केली. 'शेवटच्या ओव्हरमध्ये जे घडलं ते खूप निराशाजनक होतं. आम्ही मॅचमध्ये बराच काळ चांगलं खेळू न शकल्यानं त्या परिस्थितीमध्ये अडकलो होतो. मी किंवा दिल्ली कॅपिटल्स या प्रकरणाशी सहमत नाहीत. अंपायरचा निर्णय चूक असो किंवा बरोबर तो मान्य केला पाहिजे. कुणी मैदानावर धावत गेलं. आम्हाला हे मान्य नाही. हे चांगलं घडलं नाही. IPL 2022 : अंपायर्सच्या निर्णयावरील नाराजी भोवली, पंतसह दिल्लीच्या कोचवर मोठी कारवाई शेवटच्या ओव्हरच्या ड्रामामुळे गाजलेली ही मॅच अखेर राजस्थान रॉयल्सनं 15 रननं जिंकली. या विजयासह राजस्थाननं पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. तर दिल्लीची टीम सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rishabh pant

    पुढील बातम्या