मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: विराट आणि ABD पुन्हा येणार एकत्र! RCB च्या हेड कोचनं दिले संकेत

IPL 2022: विराट आणि ABD पुन्हा येणार एकत्र! RCB च्या हेड कोचनं दिले संकेत

एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) निवृत्त झाल्यानं त्याचे फॅन्स निराश झाले आहेत. या सर्व फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि डिव्हिलियर्स ही जोडी पुन्हा आरसीबीमध्ये एकत्र दिसण्याची चिन्हं आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा खेळाडू होता. डिव्हिलियर्स निवृत्त झाल्यानं त्याचे फॅन्स निराश झाले आहेत. या सर्व फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि डिव्हिलियर्स ही जोडी पुन्हा आरसीबीमध्ये एकत्र दिसण्याची चिन्हं आहेत.

आरसीबीचे हेड कोच संजय बांगरने (Sanjay Bangar) 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना याबाबतचे संकेत दिले आहेत. 'डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूनं बॅटींग कोच म्हणून काम केले तर ते खेळाडूंच्या फायद्याचे ठरेल. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे,' असे बांगरने सांगितले. आरसीबीकडून याबाबतची अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

'संजय बांगर यापूर्वी टीम इंडियाचे बॅटींग कोच होते. ते आता पुढील सिझनमध्ये आरसीबीचे हेड कोच असतील. हेड कोचला बॅटींग आणि बॉलिंगसह टीमच्या एकूण प्लॅनिंगवर लक्ष द्यावं लागतं. त्याच्याकडे वेळ कमी असतो. बॅटींग कोच हा बॅटर्सना चुका दाखवण्याचे तसेच योग्य प्रशिक्षण देण्याचे काम करतो,'  असे बांगरने यावेळी स्पष्ट केले होते.

विराट झाला होता भावुक

विराट आणि डिव्हिलियर्स 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीममध्ये एकत्र होते. या दोघांनी अनेक दमदार पार्टनरशिप एकत्र केल्या आहेत. मैदानात आणि मैदानाच्या बाहेरही दोघांमधील केमिस्ट्री प्रसिद्ध आहे. डिव्हिलियर्सचा जिवलग मित्र असलेल्या विराटनं या सिझननंतर आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. तर आता डिव्हिलिर्यसनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आरसीबीमधील एका युगाचा शेवट झाला आहे.

IND vs NZ: मुंबईकरचा टीम इंडियाला पुन्हा तडाखा, पहिल्याच ओव्हरमध्ये दिले 2 धक्के

डिव्हिलियर्स निवृत्त झाला त्या दिवशी विराट चांगलाच भावुक झाला होता. 'आमच्या काळातील बेस्ट खेळाडू आणि मला भेटलेला सर्वात प्रेरणादायी व्यक्ती. माझ्या भावा, तू आजवर दे काही केलंस, तसंच आरसीबीला जे दिलं आहेस त्याचा नेहमीच अभिमान बाळग. आपल्यातील नातं हे खेळाच्या पलिकडचं आहे आणि नेहमी असेल.' अशी भावना विराटनं ट्विट करत व्यक्त केली होती.

First published:

Tags: Cricket news, RCB, Virat kohli