• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: डेव्हिड वॉर्नरला आऊट करताच पंजाबच्या खेळाडूनं मैदानात केला डान्स, VIDEO

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरला आऊट करताच पंजाबच्या खेळाडूनं मैदानात केला डान्स, VIDEO

डेव्हिड वॉर्नरला (David Warner) फॅबियन अ‍ॅलन (Fabian Allen) यानं आऊट केलं. वेस्ट इंडिजच्या अ‍ॅलनची पंजबाच्या टीमकडून ही पहिलीच मॅच होती. वॉर्नरला आऊट करताच त्यानं खास पद्धतीनं डान्स करत सेलिब्रेशन केलं.

 • Share this:
  चेन्नई, 22 एप्रिल: माजी विजेते सनरायझर्स हैदराबादानं (Sunrisers Hyderabad) बुधवारी झालेल्या एकतर्फी मॅचमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 9 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा एकमेव बॅट्समन आऊट झाला. वॉर्नरनं 37 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 37 रन काढले. वॉर्नरला फॅबियन अ‍ॅलन (Fabian Allen) यानं आऊट केलं. वेस्ट इंडिजच्या अ‍ॅलनची पंजबाच्या टीमकडून ही पहिलीच मॅच होती. वॉर्नरला आऊट करताच त्यानं खास पद्धतीनं डान्स करत सेलिब्रेशन केलं. पंजाबनं दिलेलं 121 रनचं आव्हान हैदराबादनं आरामात पार केलं. हैदराबादचा या सिझनमधील पहिलाच विजय असून पंजाब किंग्जचा  सलग तिसरा पराभव आहे. हैदराबादचा खराब बॅटिंगमुळे मागील तीन सामन्यात पराभव झाला होता. पंजाब किंग्ज विरुद्ध त्यांनी ती चूक केली नाही. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 73 रनची भक्कम पार्टरनरशिप केली. हैदराबादच्या इनिंगमधील 11 व्या ओव्हरमध्ये फॅबियन अ‍ॅलनला पूल मारण्याचा वॉर्नरचा प्रयत्न फसला आणि मयंक अग्रवालनं त्याचा कॅच घेतला. मयंकनं तो कॅच घेताच अ‍ॅलननं मैदानातच डान्स करायला सुरुवात केली. हैदराबादची त्यानंतर एकही विकेट पडली नाही. या  आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या अनुभवी केन विल्यमसननं (Kane Williamson) बेअरस्टोला भक्कम साथ दिली. या दोघांनी चांगल्या ओपनिंग पार्टरनरशिपचा बेरंग होणार नाही, याची काळजी घेतली. बेअरस्टोनं 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. त्यानं नाबाद 63 रन काढले. हैदराबादचा चार मॅचमधील हा पहिलाच विजय आहे. आता त्यांची पुढील मॅच 25 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: