मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: मॉर्गनचा फॉर्म बनला KKR ची डोकेदुखी, कॅप्टनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

IPL 2021: मॉर्गनचा फॉर्म बनला KKR ची डोकेदुखी, कॅप्टनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

यूएईमध्ये सुरु असलेल्या या आयपीएलमध्ये केकेआरनं (KKR) 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. केकेआरची कामगिरी समाधानकारक होत असली तर त्यांचा कॅप्टन इयन मॉर्गनचा (Eoin Morgan) फॉर्म टीमची डोकेदुखी बनला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 ऑक्टोबर : कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये (IPL 2021, Phase 2) पुनरागमन केलं आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या या आयपीएलमध्ये केकेआरनं (KKR) 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत.  कोलकाताची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट देखील चांगला असून त्यामुळे 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची त्यांना चांगली संधी आहे.

केकेआरची कामगिरी समाधानकारक होत असली तर त्यांचा कॅप्टन इयन मॉर्गनचा (Eoin Morgan) फॉर्म टीमची डोकेदुखी बनला आहे. मॉर्गननं या आयपीएलमधील 11 इनिंगमध्ये फक्त 109 रन केले आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी 10.90 असून स्ट्राईक रेट 100.92 आहे. किमान 10 इनिंगचा विचार केला तर आजवरच्या आयपीएल इतिहासात कोणत्याही कॅप्टनची ही सर्वात खराब सरासरी आहे.

या यादीमध्ये हरभजन सिंग (Harbhajan Singh) दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरभजन 2012 च्या आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता. त्यावेळी त्यानं 12 च्या सरासरीनं 108 रन केले. पण हरभजन हा एक बॉलर असून मॉर्गन बॅटर आहे. तरीही मॉर्गनची सरासरी हरभजनपेक्षा कमी आहे.

IPL 2021, Points Table : पंजाबच्या विजयानं मुंबईला दिलासा, पाहा कशी आहे Play off ची संधी

कोलकाताचा पराभव

पंजाब किंग्ज विरुद्ध शुक्रवारी झालेल्या मॅचमध्येही मॉर्गननं निराशा केली. तो फक्त 2 रन काढून आऊट झाला. कोलकाताच्या टॉप ऑर्डरनं या मॅचमध्ये चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यानंतर मोठा स्कोअर करण्याची जबाबदारी कॅप्टन म्हणून मॉर्गनची होती. पण, त्यामध्ये त्याला अपयश आले. मोहम्मद शमीनं त्याला आऊट केलं.

कोलकातानं ठेवलेलं 166 रनचं आव्हान पंजाबने 19.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 5 रनची गरज होती. व्यंकटेश अय्यरने सेट झालेल्या केएल राहुलची विकेट घेत पंजाबला धक्का दिला. यानंतर पंजाबला विजयासाठी 4 बॉलमध्ये 4 रनची गरज होती. तेव्हा शाहरुख खानने सिक्स मारत पंजाबला जिंकवून दिलं.

IPL 2021: अंपायरच्या निर्णयाचा पंजाबला झाला मोठा फायदा, KKR ठरली दुर्दैवी

पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या ओपनिंग जोडीने 70 रनची पार्टनरशीप केली. राहुल 67 रनवर आणि मयंक 40 रनवर आऊट झाला. शाहरुख खानने 9 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले, यात 2 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. केकेआरकडून  व्यंकटेश अय्यरने 49 बॉलमध्ये सर्वाधिक 67 रन केले. तर राहुल त्रिपाठीने 34 आणि नितीश राणाने 31 रन केले.

First published:

Tags: IPL 2021, KKR