Home /News /sport /

IPL 2021: 'ज्यांना जायचं असेल त्यांनी...' खेळाडूंच्या गळतीवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया

IPL 2021: 'ज्यांना जायचं असेल त्यांनी...' खेळाडूंच्या गळतीवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया

देशात वाढणाऱ्या कोरोना (Corona) संकटाचे पडसाद आयपीएल स्पर्धेमध्ये (IPL 2021) उमटले आहे. त्यामुळे काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. या संपूर्ण विषयावर BCCI नं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 26 एप्रिल: देशात वाढणाऱ्या कोरोना (Corona) संकटाचे पडसाद आयपीएल स्पर्धेमध्ये (IPL 2021) उमटले आहे  टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) यांच्यासह चार विदेशी खेळाडूंनी या कारणामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडूंची गळती सुरु झाल्यानं आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. या स्पर्धेतून माघार घेण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्या निर्णयामध्ये बीसीसीआय कोणतीही आडकाठी करणार नाही. कोणत्याही खेळाडूला माघार घेण्याची इच्छा असेल तर तो तसा निर्णय घेऊ शकतो, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी  दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) प्रमुख बॉलर आर. अश्विननं  कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रविवारची मॅच झाल्यानंतर अश्विननं ही घोषणा केली आहे. माझं कुटुंब सध्या Covid-19 शी लढा देत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएलमध्ये खेळेल असं अश्विननं जाहीर केलं आहे. अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane  Richardson) या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. हे दोघंही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचे सदस्य आहेत. आरसीबीनं त्यांच्या ट्विटर हँडरलवरुन याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. IPL 2021 : कोरोना पॉझिटिव्ह ते मॅच विनर, बापूची 'सुपर' कामगिरी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर एन्ड्रयू टाय (Andrew Tye) याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. टाय हा राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सदस्य आहे. 34 वर्षांच्या ऍन्ड्रयू टायने ऑस्ट्रेलियासाठी 7 वनडे आणि 28 टी-20 खेळल्या. आयपीएलच्या या मोसमात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. टायने शेवटा सामना बिग बॅश लिगमध्ये पर्थ स्क्रॉचर्ससाठी सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळला होता. राजस्थान रॉयल्सचा  लियाम लिव्हिंगस्टोन  (Liam Livingstone) देखील बायो-बबलच्या त्रासामुळे आधीच आयपीएल सोडून गेला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Covid-19, IPL 2021

    पुढील बातम्या