मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: मुंबई इंडियन्सची कामगिरी का खालवली? वाचा कुठे होत आहे चूक

IPL 2021: मुंबई इंडियन्सची कामगिरी का खालवली? वाचा कुठे होत आहे चूक

आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021 2nd Phase) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक होत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं यूएईमध्ये सुरु असलेल्या लीगमध्ये सलग 3 मॅट गमावल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021 2nd Phase) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक होत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं यूएईमध्ये सुरु असलेल्या लीगमध्ये सलग 3 मॅट गमावल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021 2nd Phase) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक होत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं यूएईमध्ये सुरु असलेल्या लीगमध्ये सलग 3 मॅट गमावल्या आहेत.

मुंबई, 27 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021 2nd Phase) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक होत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं यूएईमध्ये सुरु असलेल्या लीगमध्ये सलग 3 मॅट गमावल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या पराभवामुळे मुंबईची 'प्ले ऑफ' ची वाटचाल खडतर झाली आहे.

मुंबई इंडियन्सच्या अर्धा डझन खेळाडूंची टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. पण यापैकी बहुतेकांनी या सिझनमध्ये निराशा केली आहे.  विशेषत: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे मुंबईचे मिडल ऑर्डरचे बॅट्समन सध्या फॉर्ममध्ये नाहीत. सूर्यकुमार यादवनं मागच्या तीन मॅचमध्ये 3, 5 आणि 8 रन काढले आहेत. इशान किशनचीही हीच परिस्थिती आहे. त्यानं 3 मॅचमध्ये मिळून फक्त 34 रन काढले आहेत.

सूर्या आणि इशान फॉर्मात नसल्यानं मुंबईला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयश यत आहे. आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या जोडीनं चांगली सुरवात करुन दिली होती. या सुरुवातीचा फायदा उचलण्यात सूर्या आणि इशानला अपयश आलं. त्याचा फटका मुंबईला बसला.

T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया अडचणीत, विराटला सतावतेय मोठी चिंता

लोअर ऑर्डरही अपयशी

मिडल ऑर्डर प्रमाणेच मुंबई इंडियन्सची लोअर ऑर्डरही अपयशी ठरत आहे. आरसीबी विरुद्ध मुंबईनं शेवटच्या 5 विकेट्स फक्त 5 रनमध्ये गमावल्या. कोलकाता विरुद्ध रोहित आणि डिकॉक जोडीनं 9.2 ओव्हर्समध्ये 78 रनची पार्टनरशिप केली. रोहित आऊट होताच मुंबईची इनिंग ढेपाळली. त्यानंतरच्या 64 बॉलमध्ये फक्त 77 रन काढता आले. मुंबईनं दिलेलेलं 156 रनचं लक्ष्य कोलकातानं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळेही मुंबईची चिंता वाढली आहे. हार्दिक यूएईमध्ये पहिल्या दोन मॅच खेळू शकला नाही. तर तिसऱ्या मॅचमध्ये तो फक्त 3 रन काढून आऊट झाला. बॅटींग आणि बॉलिंग या दोन्ही क्षेत्रात टीमला संतुलित करण्याचं काम हार्दिक करतो. तो फॉर्मात नसल्यानं पोलार्ड आणि कृणालवरचा दबाव वाढला आहे.

MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या बॉलरनं विकेट मिळताच केलं असं काही...पाहा VIDEO

आक्रमक खेळाचा अभाव

मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये आक्रमक क्रिकेट खेळत नाहीय, असं मत टीमचे क्रिकेट डायरेक्टर झहीर खाननं व्यक्त केलं आहे. आरसीबी विरुद्ध झालेल्या पराभवानंतर झहीरनं हे मत व्यक्त केलंय. 'दुबईच्या पिचवर आरसीबीनं 165 रन केले. आम्ही सुरुवात चांगली केली होती. पण नंतर आमची मिडल ऑर्डर कोसळली. आक्रमक क्रिकेट खेळण्यात आम्हाला अपयश येत आहे. झटपट विकेट्स गमावल्या तर मॅचमध्ये कमबॅक करणे अवघड आहे.' असं झहीरनं सांगितलं.

RESULT DATA:

मुंबई इंडियन्सची पुढची मॅच पंजाब किंग्ज विरुद्ध मंगळवारी होणार आहे. 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी ही मॅच जिंकणे मुंबईला आवश्यक आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians