मुंबई, 2 मे: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची लोकप्रियता आजही कायम आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसतो. मात्र त्याची मॅचमधील कोणतीही कृती ही काही वेळातच व्हायरल (Viral) होते. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) मॅच असेल तर धोनीच्या प्रत्येक हलचालीकडं मैदानातील कॅमेऱ्यांचं आणि सोशल मीडियाचं लक्ष असतं.
या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) सीएसके अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. एका शूटींगचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) एक डायलॉग पाठ करण्याचा प्रयत्न करत आहे. साक्षीला तो डायलॉग नीट जमत नाही. त्यामुळे तिचा गोंधळ उडतो. त्यावेळी धोनी तिला तू पाहूनही म्हणू शकत नाहीस, तर डिलिव्हर कसं करशील? असा प्रश्न विचारत साक्षीची फिरकी घेतली. धोनीनंच 2019 साली हा व्हिडीओ इन्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.
View this post on Instagram
सहकाऱ्यांवर संतापला धोनी
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध शनिवारी झालेल्या अटीतटीच्या मॅचमध्ये चेन्नईचा 4 विकेट्सनं पराभव झाला. मोठी धावसंख्या उभारुनही पराभव झाल्यानं चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नाराज झाला आहे. या पराभवानंतर धोनीनं ही नाराजी उघडपणे व्यक्त केली.
'इंदिरानगर का गुंडा' द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO
"बॉलिंगपेक्षा आमची फिल्डिंग खराब झाली. आम्ही अगदी मोक्याच्या क्षणी कॅच सोडले. बॉलर्सना देखील अनेकदा योजनेप्रमाणे बॉलिंग करण्यात अपयश आलं. त्यांनी अनेक खराब बॉल टाकले. ही एक मोठी स्पर्धा आहे. आम्ही काही अटीतटीच्या मॅच जिंकतो तर काही हरतो. सध्या तरी आमची नजर पॉईंट टेबलवर नाही. आम्ही एकावेळी एकाच मॅचचा विचार करत आहोत आणि त्या पद्धतीनं तयारी करत आहोत," असं धोनीनं सांगितलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram post, IPL 2021, MS Dhoni, Sakshi dhoni, Video viral