• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: डीव्हिलिर्यसच्या खेळीनं रोहितची टीम पराभूत! सेहवागची मजेदार कमेंट Viral

IPL 2021: डीव्हिलिर्यसच्या खेळीनं रोहितची टीम पराभूत! सेहवागची मजेदार कमेंट Viral

एबी डीव्हिलियर्सनं ((AB De Villiers) फक्त 27 बॉलमध्ये 48 रन काढले. त्याचा स्ट्राईक रेट 177 पेक्षा जास्त होता. मोक्याच्या क्षणी डिव्हिलियर्सनं ही खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला.

 • Share this:
  मुंबई, 10 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI) 2 विकेट्सनं पराभव केला.आरसीबीनं ही मॅच शेवटच्या बॉलवर जिंकली. पाच विकेट्स घेणारा हर्षल (Harshal Patel) आणि एबी डीव्हिलियर्स (AB De Villiers) आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले. डीव्हिलियर्सनं फक्त 27 बॉलमध्ये 48 रन काढले. त्याचा स्ट्राईक रेट 177 पेक्षा जास्त होता. मोक्याच्या क्षणी डिव्हिलियर्सनं ही खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) या खेळीमुळे प्रभावित झाले आहेत. सेहवागनं डीव्हिलियर्सच्या खेळीवर मजेदार ट्विट केलं असून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालं आहे. "विल पॉवर (इच्छाशक्ती) म्हणजेच डीव्हिलियर्स पॉवर. सर्वांना आश्चर्यचकीत करणारी पॉवर. आयपीएलचा लोगो देखील डीव्हिलियर्सचा खेळ पाहून हळूच डिझाईन केला आहे." सेहवागनं हर्षल पटेलची देखील प्रशंसा केली आहे. "पटेल भाईच्या राज्यात आरसीबीची बॉलिंग पाहून मजा आली. जबरदस्त स्पेल 5/27" संजय मांजेरकर यांनीही डीव्हिलियर्सच्या खेळेची प्रशंसा केली आहे. "जीनियसपेक्षा ही खास,' या शब्दासाठी विशेषण काय आहे. एबी खरंच असा आहे. त्याची बॅटींग कमाल आहे," असं ट्विट मांजरेकर यांनी केलं आहे. डीव्हिलियर्सची निर्णायक खेळी आरसीबीनं 160 रनचं टार्गेट अगदी शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. आरसीबी मॅच अगदी सहज जिंकणार असं ाटत होतं. पण विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघं आऊट झाल्यानंतर त्यांची टीम अडचणीत आली होती. (On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन! ) या अडचणीच्या वेळी डीव्हिलियर्सनं जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांचा सहज सामना करत 48 रन काढले. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये तो रन आऊट झाला.
  Published by:News18 Desk
  First published: