Home /News /sport /

IPL 2021: केवळ 44 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूचा विराटच्या टीममध्ये समावेश, वाचा काय आहे कारण

IPL 2021: केवळ 44 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूचा विराटच्या टीममध्ये समावेश, वाचा काय आहे कारण

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या आरसीबी टीममध्ये इंग्लंडचा पेस बॉलर जॉर्ज गार्टन (George Garton) याचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा पेस बॉलर केन रिचर्डसनच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 2021 चे  उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 यादरम्यान यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यासाठी सगळ्याच टीम आता कंबर कसत आहेत. कारण आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यासाठी सर्वांनाच दमदार खेळायचं आहे. भारतीय टीमचा कॅप्टन आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) टीमचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या आरसीबी टीममध्ये इंग्लंडचा पेस बॉलर जॉर्ज गार्टन (George Garton) याचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा पेस बॉलर केन रिचर्डसनच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. जॉर्ज डावखुरा अनकॅप्ड पेस बॉलर असून त्याने 38 टी-20 मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने 44 विकेट्स घेतल्या आहेत. हे वाचा-IND vs ENG : 78 रनवर ऑल आऊट, टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीचे 10 क्षण 24 वर्षांच्या गार्टनने टी-20 तली सरासरी 20.77 असून स्टाइक रेट 124.66 आहे. आरसीबीने आतापर्यंत टीममधले 4 खेळाडू बदलले असून गार्टनचा हा पहिला आयपीएल सिझन आहे. 20 सप्टेंबर 2021 ला आरसीबीविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मॅच आबुधाबीमध्ये होणार आहे. गार्टन ‘द हंड्रेड’ मध्येही (The Hundred) खेळला असून त्याने त्यात साउदर्न ब्रेव्ह संघाकडून 9 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या त्याच इकॉनॉमी 9 आहे, असं आरसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तीनदा घेतल्यात 4 विकेट्स गार्टनने टी-20 मध्ये 4 विकेट्स घेण्याची कामगिरी तीन वेळा केली आहे. 16 रनमध्ये 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. इकॉनॉमी 8.26 आहे. त्याने 23 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 53 विकेट्स घेतल्या असून 21 च्या सरासरीने 542 रन्स केल्या आहेत ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ए दर्जाच्या 24 मॅचमध्ये त्याने 29 विकेट्स घतेल्या असून त्यात 43 रन्समध्ये 4 विकेट्स हे त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. अंडर -19  वर्ल्ड कपमध्येही (U-19 World Cup) तो खेळला आहे. RCB आहे तिसऱ्या स्थानी या वर्षीचा आयपीएल सिझन सुरू झाला होता पण भारतात झालेल्या या स्पर्धेत बायोबबलमध्ये राहूनही खेळाडूंना कोविड-19 ची बाधा होत होती त्यामुळे 4 मे 2021 ला ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्सने 7 सामने खेळून 10 गुण मिळवले होते आणि गुणतक्त्यात टीम तिसऱ्या स्थानावर होती. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स तर दुसऱ्या स्थानी महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज ही टीम होती. आरसीबीने आतापर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: IPL 2021

पुढील बातम्या