चेन्नई, 8 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनचं (IPL 2021) विजेतेपद पटकावण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) पूर्णपणे सज्ज आहे. आयपीएल 2021 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आरसीबीच्या खेळाडूंनी सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यानंतर काही सदस्यांनी फोटोशूटमध्ये भाग घेतला. यावेळी या सर्व खेळाडूंनी आरसीबीची नवी जर्सी घातली होती.
या फोटोशुटमध्ये विराट कोहली (Virat Kohli), एबी डीव्हिलियर्स (AB Devilliers) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हे तीन दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. या तिघांनी यावेळी बरीच धमाल केली. त्याचबरोबर या तिन्ही क्रिकेटर्सनी यावेळी एकत्र डान्स देखील केला.
क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर विराट पहिल्यांदाच त्याचा जिवलग मित्र डीव्हिलियर्सला भेटला. यावेळी दोघांनी एकमेकांना त्याच्या घरच्यांची खुशाली विचारली. त्यानंतर त्यांनी एकत्र फोटोशूट सुरु केला. या फोटोशूटमध्ये मॅक्सवेल देखील सहभागी झाला होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Bold Diaries: Virat Kohli and AB de Villiers Photoshoot
When two of the biggest superstars come out of quarantine, they mean business! Schedule for today: Photoshoot, Ad shoots and then some proper cricket practice at Chepauk.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/4fnA2lLgFV — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021
T-2 Days: Virat Kohli and AB de Villiers at RCB’s practice session
Full squad training at Chepauk, and some pep talk from the experienced folks, catch what happened at yesterday’s practice session on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/RSXKv6xD6B — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 8, 2021
RCB ला मिळाला नवा स्टार
या आयपीएलपूर्वी सर्वच टीम आपल्या तयारीला सध्या फायनल टच देत आहे. आरसीबीच्या खेळाडूंची नुकतीच एक प्रॅक्टीस मॅच झाली. या मॅचमध्ये मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याने जबरदस्त खेळ केला. त्याने फक्त 49 बॉलमध्ये 104 रन काढले. त्याच्या या फटेबाजीमुळे विराटसह टीममधील सर्वजण प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे रजत मिडल ऑर्डरचा खेळाडू असल्यानं त्याचा फॉर्म हा आरसीबीसाठी आनंदाची बातमी आहे.
( सतत फ्लॉप होऊनही Maxwell ला इतके पैसे का मिळतात? गंभीरनं सांगितलं कारण )
रजतनं या मॅचमध्ये 49 बॉलमध्ये 104 रन काढले. या आक्रमक फटकेबाजीमुळे रजतच्या टीमनं 225 रनचं टार्गेट चार बॉल राखून पार केलं. रजतनं पहिल्या मॅचमध्ये 35 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली होती. यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही रजतनं चांगली कामगिरी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Dance video, Glenn maxwell, IPL 2021, RCB, Social media viral, Sports, Virat kohli