चेन्नई, 19 फेब्रुवारी: इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या लिलावामध्ये (IPL 2021 Auction) 8 टीमनं एकूण 57 खेळाडूंची खरेदी केली. पंजाबनं सर्वात जास्त 9 खेळाडू घेतले. दिल्ली आणि राजस्थान, कोलकाता आणि बंगळुरुनं प्रत्येकी 8, मुंबईनं 7, चेन्नईनं 6 तर हैदराबादनं सर्वात कमी 3 खेळाडू खरेदी केले. या लिलावात काही दिग्गज खेळाडूंना कुणीही खरेदी केलं नाही. त्यामध्ये एक खेळाडू असा होता ज्याच्यासाठी विराट कोहलीची (Virat Kohli) 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मागच्या वर्षी श्रीलंकेचा फास्ट बॉलर इसरु इसुरु उदानाला (Isuru Udana) 50 लाखांना घेतले होते. मात्र त्याला खरेदी करण्यासाठी बंगळुरुची त्यांच्याकडील सर्व 28 कोटी रुपये मोजण्याची तयारी होती. बंगळुरुचे क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन यांनी मागच्या वर्षी झालेल्या लिलावानंतर याचा गौप्यस्फोट केला होता.
बंगळुरुनं मोठ्या अपेक्षेनं घेतलेल्या उदानाची मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमधील कामगिरी साधारण होती. त्यानं 10 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या. तसंच त्याचा इकॉनॉमी रेटही 9 पेक्षा जास्त होता. त्यामुळे या सिझनपूर्वी बंगळुरुनं त्याला रिलीज केले होते. या लिलावात उदाना पुन्हा एकदा सहभागी झाला होता. मात्र त्याला एकाही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही.
(हे वाचा : मंदीत चांदी! 46 पट जास्त किंमतीमध्ये झाली या खेळाडूची विक्री )
बंगळुरुनं दोघांसाठी मोजली मोठी किंमत!
बंगळुरुच्या टीमनं या लिलावापूर्वी सर्वात जास्त खेळाडूंना रिलीज केलं होतं. त्यांनी या रिक्त जागा भरण्यासाठी यंदा जोरदार बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) साठी चेन्नई आणि बंगळुरुमध्ये जोरदार चुरस रंगली होती. अखेर बंगळुरुनं 14 कोटी 25 लाख रुपयांमध्ये मॅक्सवेलला खरेदी केलं.
न्यूझीलंडचा ऑल राऊंडर कायले जेमिसनची (Kyle Jamieson) या लिलावासाठी 75 लाख रुपये बेस प्राईज होती. गेल्या काही महिन्यापासून मोठ्या फॉर्मात असलेल्या जेमिसनला या लिलावात रेकॉर्डब्रेक रक्कम मिळाली आहे. भारतामध्ये अजून एकही मॅच न खेळलेल्या जेमिसनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) 15 कोटींना खरेदी केलं आहे