Home /News /sport /

IPL च्या नव्या टीमसाठी पुणे नाही तर अहमदाबाद सर्वात आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

IPL च्या नव्या टीमसाठी पुणे नाही तर अहमदाबाद सर्वात आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीमचा समावेश होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या (BCCI) 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याचा अंतिम निर्णय होणार आहे. IPL च्या नव्या टीमसाठी अहमदाबाद (Ahmedabad) शहराचे नाव आघाडीवर आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई 4 डिसेंबर : कोरोना व्हायरसमुळे (Covid 19) आयपीएल (IPL) स्पर्धा होणार नाही, अशी चर्चा सुरु असतानाच आयपीएल 2020 (IPL 2020) युएई (UAE) मध्ये दणक्यात पार पडली. आयपीएल 2020 नंतर आता आयपीएल 2021 (IPL 2021) चे पडघम वाजू लागले आहेत. आयपीएल 2021 मध्ये आणखी दोन टीमचा समावेश होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या (BCCI) 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याचा अंतिम निर्णय होणार आहे. IPL च्या नव्या टीमसाठी अहमदाबाद (Ahmedabad) शहराचे नाव आघाडीवर आहे. अहमदाबाद आघाडीवर का? अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिमचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या नुतनीकरणानंतर अहमदाबाद स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार झाली आहे. हे स्टेडियम तयार करण्यासाठी सुमारे सातशे कोटींचा खर्च झाला असून नव्या स्टेडियममध्ये मार्च महिन्यात पहिला सामना होणार होता. कोव्हीड 19 मुळे अहमदाबादमध्ये मार्चमध्ये सामना होऊ शकला नाही. आता पुढील वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी डे-नाईट टेस्ट इथे खेळवली जाणार आहे. क्रिकेटचे अहमदाबाद कनेक्शन आयपीएलमध्ये यापूर्वी गुजरातमधील राजकोटची टीम होती. 2016 आणि 17 ही दोन वर्षे आयपीएलमध्ये राजकोट टीम होती. मात्र अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचे भारतीय क्रिकेटशी जुने कनेक्शन आहे. सुनील गावसकरांनी मोटेरावरच 1987 साली टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला होता. कपिल देवने 1994 साली मोटेरावरच रिचर्ड हॅडलीच्या 431 टेस्ट विकेट्सचा विक्रम मोडला होता. अहमदाबादची कुणाशी शर्यत? आयपीएलच्या नव्या टीमबद्दल माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार अहमदाबादचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. अहमदाबादसह  लखनऊ आणि पुणे या शहरांची नावं देखील चर्चेत आहेत. अडानी ग्रुप आणि संजीव गोयंका यांची RPSG ग्रुप या दोन टीम विकत घेण्यासाठी आघाडीवर आहेत. याआधी गोयंका दोन वर्षांसाठी पुण्याच्या टीमचे मालक होते. 2008 साली आयपीएलची सुरुवात झाली होती, तेव्हा 8 टीम होत्या, पण यानंतर ही संख्या 10 करण्यात आली होती, पण पुन्हा एकदा निर्णय बदलून ही संख्या 8 झाली. आता परत एकदा बीसीसीआय आयपीएल टीमची संख्या 10 करण्याचा विचार करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या