Home /News /sport /

IPL 2021 संबंधी मोठी बातमी! गैरव्यवहार प्रकरणात 2 बुकींना अटक

IPL 2021 संबंधी मोठी बातमी! गैरव्यवहार प्रकरणात 2 बुकींना अटक

दिल्ली पोलिसांनी स्टेडियममध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन बुकींना (Bookies) अटक केली आहे. या दोन्ही बुकींनी रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या मॅचमध्ये अवैध घुसखोरी केली होती.

     नवी दिल्ली, 5 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये झालेल्या कोरोना उद्रेकानंतर ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय (BCCI) नं घेतला. या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बीसीसीआयनं ही स्पर्धा स्थगित करण्याता निर्णय जाहीर केल्यानंतर 24 तासांच्या आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी स्टेडियममध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करणाऱ्या दोन बुकींना (Bookies) अटक केली आहे. हे दोन्ही बुकी रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad) या मॅचमध्ये बनावट मान्यतापत्राच्या (accreditation) आधारे स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांची रवानगी 5 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ANI नं दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही बुकींना 2 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील मान्यतापत्र बनावट आढळले. या दोघांच्या विरोधातही FIR दाखल करण्यात आली असून आता त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यंदाचे आयपीएल बायो-बबलमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे फक्त निवडक व्यक्तींनाच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी! दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं घरातून अपहरण, 4 जणांना अटक यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांना कोरोनाची लागण झाली, यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि इतर दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर मंगळवारी हैदराबादचा (SRH) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अमित मिश्रा (Amit Mishra) यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं, त्यामुळे ही आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Crime news, IPL 2021

    पुढील बातम्या