IPL 2021: आयपीएलला कोरोनाचा फटका, KKR नंतर CSK चे 3 सदस्य पॉझिटीव्ह

IPL 2021: आयपीएलला कोरोनाचा फटका, KKR नंतर CSK चे 3 सदस्य पॉझिटीव्ह

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्या टीममधील 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीममधील 3 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोरनाचा फटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्या टीममधील 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीममधील 3 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. यापैकी एकही खेळाडू नाही. (Three non-playing members of the Chennai Super Kings camp have tested positive for Covid-19)

'ईएसपीएन क्रिकइन्फोनं' दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan), बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (L Balaji)आणि टीमच्या बसमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चेन्नईची टीम सध्या दिल्लीमध्ये आहे. चेन्नईच्या खेळाडूंपैकी कुणालाही कोरनाची लागण झालेली नाही.सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट रविवारी झालेल्या टेस्टमध्ये निगेटीव्ह आढळला आहे.

चेन्नईच्या कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन्ही सदस्यांची सोमवारी आणखी एक चाचणी होणार आहे. या चाचणीमध्येही त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्यांना इतर खेळाडूंपासून अलग करण्यात येणार आहे. त्या परिस्थितीमध्ये या सर्वांना 10 दिवस इतर खेळाडूंपासून दूर राहवं लागेल. तसंच बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येणं आवश्यक आहे.

IPL 2021: 'या' कारणामुळे झाला KKR मध्ये कोरोनाचा शिरकाव! मॅच स्थगित करण्याची Inside Story

कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात सोमवारी होणारी मॅच अखेर स्थगित करण्यात आली आहे. सोमवारची मॅच पुढं ढकलण्यात आली असून आता त्या मॅचची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सनं या आयपीएलमध्ये सातपैकी पाच मॅच जिंकल्या असून पॉईंट टेबलमध्ये चेन्नईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईची पुढील मॅच बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 3:01 PM IST

ताज्या बातम्या