मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL च्या नव्या टीमना 3 फ्रॅन्चायजींचा विरोध, बीसीसीआयच्या अडचणी वाढणार!

IPL च्या नव्या टीमना 3 फ्रॅन्चायजींचा विरोध, बीसीसीआयच्या अडचणी वाढणार!

आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम संपल्यानंतर बीसीसीआय (BCCI) पुढच्या मोसमाची तयारी करायला लागली आहे. आयपीएलमध्ये नवी टीम येणार असल्यामुळे चाहते खूश असले, तरी आयपीएलच्या टीम मात्र बीसीसीआयच्या या पावलामुळे जास्त नाराज असल्याचं बोललं जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम संपल्यानंतर बीसीसीआय (BCCI) पुढच्या मोसमाची तयारी करायला लागली आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार आयपीएलच्या पुढच्या हंगामाला मार्च महिन्यापासून सुरुवात होऊ शकते. त्याआधी बीसीसीआय खेळाडूंचा मोठा लिलाव करून नवीन टीम मैदानात उतरवू शकते. आयपीएलमध्ये नवी टीम येणार असल्यामुळे चाहते खूश असले, तरी आयपीएलच्या टीम मात्र बीसीसीआयच्या या पावलामुळे जास्त नाराज असल्याचं बोललं जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या सध्याच्या 3 टीम नवी टीम आणण्याच्या विरोधात आहेत.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या तीन फ्रॅन्चायजींना पुढच्या मोसमात नवी टीम नको आहे. बीसीसीआयचा हा निर्णय टीमच्या आणि आयपीएलच्या हितासाठीही योग्य नसल्याचं काही टीमना वाटत आहे. एका आयपीएल टीमचा मालक म्हणाला, 'बीसीसीआयने आम्हाला टीम वाढवण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्हाला जी माहिती मिळाली आहे, ती माध्यमांमधूनच. बीसीसीआयला नवीन टीम जोडण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण कोरोना व्हायरसमुळे फ्रॅन्चायजीचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे 2021 साठी नवी टीम आणणं योग्य ठरणार नाही. 2022 साली हा निर्णय घेतला, तर त्यावर्षी नवीन मीडिया अधिकाराचा लिलावही होईल.'

एकीकडे आयपीएल फ्रॅन्चायजी आपल्या हिताकडे लक्ष देत आहे, तर बीसीसीआयही स्वत:ची नुकसान भरपाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. याच कारणामुळे आयपीएल 2021 मध्ये नवीन टीम आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयचे अधिकारी फ्रॅन्चायजीच्या संपर्कात आहे. आयपीएल 2021 ची चर्चा योग्य वेळी होईल, असं स्पष्टीकरण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलं आहे.

First published: